29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रशहापूरच्या आदिवासीबहुल खोस्ते गावातील स्वधर्म फाऊंडेशनच्या सांस्कृतिक व आरोग्य केंद्राचा उद्या लोकार्पण...

शहापूरच्या आदिवासीबहुल खोस्ते गावातील स्वधर्म फाऊंडेशनच्या सांस्कृतिक व आरोग्य केंद्राचा उद्या लोकार्पण सोहळा

स्वधर्म फाऊंडेशनच्या एकात्मिक ग्रामविकास संकल्पनेतून तानसा अभयारण्य परिसरातील आदिवासी व इतर सर्व नागरिकांसाठी आरोग्य सेवा, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक समन्वय सभा, जल-जमीन-जंगल संवर्धन, वनकायदा जाणीव जागृती आदी विविध सेवा देण्याच्या उद्देशातून ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातील तानसा परिक्षेत्रातील आदिवासीबहुल खोस्ते गावात लायन्स क्लब ऑफ ठाणे यांच्यातर्फे लायन्स सांस्कृतिक व आरोग्य केंद्र बांधण्यात आले आहे.

या केंद्राचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. (१८ जून) रोजी दुपारी ५ वाजता खोस्ते गावात आयोजित करण्यात आला आहे. या लोकार्पण सोहळ्याचे उदघाटन PMJF LION राजेश बल्लमवार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी शिवाजीराव देशमुख असतील. तसेच लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर शाईफेक करून हल्ला

हनुमानाच्या तोंडी अशी भाषा?? आदिपुरुष चित्रपटाच्या दिग्दर्शकाने देशाची माफी मागावी; प्रियंका चतूर्वेदी यांची मागणी

संत निवृत्तीनाथांची पालखी श्रीगोंद्यात दाखल; संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा पडणार पार

तानसा अभयारण्य परिसरातील आदिवासी व इतर सर्व नागरिकांसाठी आरोग्य सेवा, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम, सामाजिक समन्वय सभा, जल-जमीन-जंगल संवर्धन, वनकायदा जाणीव जागृती आदी विविध सेवा देण्याच्या उद्देशातून या केंद्राची निर्मिती करण्यात करण्यात आली आहे. अशी माहिती ठाण्याच्या स्वधर्म फाऊंडेशनच्या अध्यक्ष निता मनोज देशमुख यांनी दिली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी