29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे, जाणून घ्या पावसाबद्दल नवीन अपडेट

शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे, जाणून घ्या पावसाबद्दल नवीन अपडेट

बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे केरळमध्ये पावसाला विलंब झाला आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस केरळमध्ये दाखल होतो.पण यावर्षी जून महिन्यात कमी प्रमाणात पडलेल्या पावसामुळे सगळे निराश झाले आहेत. वातावरण नेहमी बदलत आहे. कुठे ऊन तर कुठे पाऊस पडत आहे. मुंबईतील पावसाच्या वातावरणासाठी आणखी एक आठवडा लागण्याची शक्यता आहे. मान्सून 2-3 दिवसांत पश्चिम बंगाल, बिहार, दक्षिण द्वीपकल्पातून पुढे सरकण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवडाभरात, महाराष्ट्रात पावसाची तूट 80 ते 90 टक्के झाली आहे. कोकणात बहुतांश भागात अत्यंत कमी पावसाचा सामना करावा लागत आहे. पावसाचे आगमन 27 जून पर्यंत होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस ऊनाचा कडकडाट असणार आहे. कोकण आणि गोव्यात बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मोसमी वारे दाखल होण्यास आणखी प्रतिक्षा करावी लागेल.

हे सुध्दा वाचा:

उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळणार नाही; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

मोदींच्या अंधभक्तांना वॅक्सिन द्यायची गरज; उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

जितेंद्र आव्हाड यांच्या पाठपुराव्याला यश; तळीयेतील ६६ दरडग्रस्तांना मिळणार हक्काची घरे

मुंबईत 27 जून 2009 मध्ये पाऊस आला तेव्हा शहरात विक्रमी उशिर झाला होता. तेव्हा मुंबईत मान्सूनचा ठराविकचं पाऊस पडला होता. चक्रीवादळ कमजोर झाले असून त्यांचे अवशेष दिसून येत आहे. चक्रीवादळ हे राजस्थानच्या दिशेने पुढे सरकल्यानंतर आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती आली आहे. आसामला हवामान विभागाने रेड अलर्ट केले आहे. आसाममधील 142 गावे पाण्याखाली गेली आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी