29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, तुकोबारायांच्या पालखीच आज गोल रिंगण; निवृत्तीनाथांच्या पालखीचे...

रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी, तुकोबारायांच्या पालखीच आज गोल रिंगण; निवृत्तीनाथांच्या पालखीचे उभे रिंगण

जेथे जातो तेथे तू माझा सांगती, चालविसी हाती धरूनिया..
अभंगाच्या गजरात विठूरायाच्या भक्तिमध्ये लीन होऊन विठूनामाचा गजर करत वारकरी पंढरपूरकडे चालत आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आज बेलवडी येथे पोहचली आहे. काल काटेवाडी पालखीत मेढ्यांचे रिंगण झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बेलवडी येथे पहिले गोल रिंगण पार पडले तर संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे आज धांडेवाडीत उभे रिंगण पार पडणार आहे.

संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सणसरहून अथुर्णकडे मार्गस्थ होत असताना वाटेत बेलवडी येथे महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात पार पडला. तुकारामांची पालखी खांद्यावर घेऊन पालखीला रिंगण दाखवण्यात आल्यानंतर पालखी मध्यभागी ठेवण्यात आली व त्यानंतर प्रथेप्रमाणे मेंढ्यांनी पालखीची प्रदक्षिणा पूर्ण केली. मेंढ्यांच्या प्रदक्षिणेनंतर पोलिसांनीदेखील पालखीला प्रदक्षिणा घातली. यानंतर दिंडीतले मानकरी, झेंडेकरी, पताकाधारी आणि महिला वारकरी यांनी पालखीला प्रदक्षिणा घातली. यावेळी मानाच्या अश्वांनी पालखीच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर अश्वांच्या टापांखालची माती उचलण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी जमली होती. ही माती शेतामध्ये टाकल्यावर भरघोस पीक येते असे वारकऱ्यांना वाटते.

हे सुध्दा वाचा:

ओडिशा रेल्वे अपघातप्रकरण, सिग्नल यंत्रणा विभागातील जुनियर इंजीनियरचं घर सीबीआयने केलं सील

शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे, जाणून घ्या पावसाबद्दल नवीन अपडेट

उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळणार नाही; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

दुसरीकडे संत निवृत्तीनाथांची पालखी काल कर्जत शहरात मुक्कामाला होती. आज ही पालखी पंढरपुरकडे रवाना झाली असून पालखीचा आजचा मुक्काम कोरेगावला असणार आहे. पंढरपुरच्या वाटेवर असताना पालखी नेटाकेवाडी मार्ग धांडेवाडीमध्ये दुपारच्या विसाव्याला थांबणार आहे. याच ठिकाणी माऊलींचे उभे रिंगण पार पडणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी व रिंगण सोहळ्यासाठी धांडेवाडी ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे. तर संत मुक्ताबाईंची पालखी पारगावमधील मुक्कामानंतर पंढरपुरच्या दिशेने निघाली आहे. पालखी आज वाकवड येथे मुक्कामाला असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी