28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्रिकेटएकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीचे आयोजन थेट अंतराळातून, पहा फोटो

एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीचे आयोजन थेट अंतराळातून, पहा फोटो

आयसीसीने भारतात होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे संपूर्ण सामने जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीचे आयोजन थेट अंतराळातून केले आहे. पृथ्वीपासून 1 लाख 20 फूट उंचीवर असलेल्या स्पेस स्ट्रॅटोस्फियरमध्ये त्याचे अनावरण करण्यात आले. या ट्रॉफीचे अनावरण केल्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरविण्यात आले. अंतराळात 65 अंश तापमान होते. ही ट्रॉफी बेस्पोक स्ट्रॅटोस्फेरिक बलूनद्वारे अंतराळात पाठवण्यात आली.

पृथ्वीच्या वातावरणाच्या काठावरुन 4000 कॅमेऱ्यांनी ट्रॉफीचे काही छायाचित्रे टिपले आहेत. जय शाह यांनी ट्वीट शेअर करताना म्हटले की, एकदिवसीय विश्वचषक 2023 ची ट्रॉफी अंतराळात अनावरण करताना क्रिकेट जगतासाठी हा एक अनोखा क्षण आहे. अंतराळात पाठवलेल्या क्रीडा ट्रॉफींपैकी ही एक आहे आणि एक नवीन मैलाचा दगड आहे. खरंच भारतातील आयसीसी पुरुष विश्वचषक ट्रॉफी दौऱ्याची सुरुवात चांगली झाली आहे. ही ट्रॉफी कुवेत, बहरीन, मलेशिया, यूएसए, नायजेरिया, युगांडा, फ्रान्स, इटली आणि यजमान भारतासह जगभरातील 18 देशांमध्ये प्रवास करणार आहे.

हे सुध्दा वाचा:

पुण्यात एमपीएससी तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारताच्या सामन्यांची यादी

तेलंगणाचे मुख्यमंत्री विठ्ठलाच्या चरणी, मंत्रिमंडळासह घेतले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन

बेंगळुरू, त्रिवेंद्रम, मुंबई, दिल्ली, लखनौ, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, पुणे, बेंगळुरू आणि धर्मशाला स्थान म्हणून शॉर्टलिस्ट केले आहे.आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ ऍलार्डिस म्हणाले की, आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी टूर हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आयसीसी विश्वचषकाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. क्रिकेटचे एक अब्जाहून अधिक चाहते आहेत आणि यापैकी जास्तीत जास्त लोकांनी ही ट्रॉफी जवळून पाहावी अशी आमची इच्छा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी