28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेच्या पुतणीवर हल्ला शिंदे गटाचा आमदार धावला मदतीला

ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेच्या पुतणीवर हल्ला शिंदे गटाचा आमदार धावला मदतीला

राजकारणात कधी कोण कोणाचा मित्र वा शत्रू नसतो याचा प्रत्यय आज आला. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांच्या पुतणीवर हल्ला झाल्याची माहिती कळताच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे मदलीला सरसावले आहेत. वास्तविक पाहता सत्तासंघर्षानंतर शिंदे आणि ठाकरे गटामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत असताना विरोधकाच्या मदतीला धावून जाण्याचा हा प्रसंग विरळच म्हणावा लागेल.

मुंबईमधील बोरिवली पूर्वेतील आभिनव नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांच्या घरात अज्ञातांनी त्यांच्या पुतणीवर हल्ला केला आहे. त्यांची पुतणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडत आहे. महिलेच्या सुरक्षेचा प्रश्व पुन्हा निर्माण झाला आहे.

हे सुध्दा वाचा:

एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीचे आयोजन थेट अंतराळातून, पहा फोटो

शासन आपल्या दारी उपक्रम कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी धमकी सत्र सुरू; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचा आरोप

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारताच्या सामन्यांची यादी

ठाकरे गटाच्या रिद्धी खुरसंगे यांच्या घरात केलेल्या हल्लाबद्दल आमदार प्रकाश सुर्वे यांना माहिती मिळाली. आमदार सुर्वे हे ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेचा मदतील धावून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आरोपीचा तपास करुन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी