28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईदुसऱ्या दिवशीही अंबरनाथमध्ये प्रवाशांचा रेल रोको; सकाळी रेल्वे विस्कळीत

दुसऱ्या दिवशीही अंबरनाथमध्ये प्रवाशांचा रेल रोको; सकाळी रेल्वे विस्कळीत

मुंबईची लोकल ट्रेन म्हटलं की डोळ्यांसमोर येणारे दृश्य म्हणजे भरगच्च गर्दीने लोकांनी भरलेली असते. लोकल ट्रेनमध्ये जागा पकडण्यासाठी सर्वांचीच धावपळ सुरु असते. अशीच घटना अंबरनाथ रेल्वे स्थानकावर घडली आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये जागा पकडण्यासाठी काही प्रवाशी यार्डातूनच ट्रेन पकडतात. यार्डात उभ्या असलेल्या लोकलमध्ये प्रवेश करणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने कारवाई करण्यात आली. यामुळे रेल्वे प्रवासी व रेल्वे पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. अंबरनाथमध्ये यार्डातून सुटणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांना बसण्यास रेल्वे पोलिसांनी मनाई केली. दरम्यान संतप्त प्रवाशांनी रेल रोको केल्याने अंबरनाथकडून मुंबईकडे जाणाऱ्या आणि कल्याणहून अंबरनाथकडे येणाऱ्या काही वाहतूक विस्कळीत झाली होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत असतानाही झालेल्या या आंदोलनामुळे रेल्वे प्रवाशांची चांगलीच त्रेधातिरपीठ उडाली होती.

सकाळच्या सुमारास कामाला जाणाऱ्यांची गर्दी असते. लांबचा प्रवास असल्यामुळे बसण्यासाठी जागा हवी असते. प्लॅटफॉर्मवरून लोकल पकडणाऱ्यांना जागा मिळत नसल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली आहे. काल यार्डात जाऊन रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना लोकलमधून उतरवलं. त्यामुळे प्रवाशांनी 10 मिनिटे लोकल अडवून ठेवली. अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळील यार्डातून सकाळी ७.५१ ची सीएसएमटी फास्ट लोकल सुटते. ही लोकल स्टेशनला येण्यापूर्वी यार्डातूनच अनेक प्रवासी लोकलमध्ये बसून जागा अडवून ठेवतात. रेल्वे पोलिसांनी १५ ते २० प्रवाशांना ताब्यात घेतलं आहे. हा सर्व गोंधळ आज सकाळी 7:50 च्या लोकलमध्ये झाला.

हे सुध्दा वाचा:

आंबेनळी घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प

ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकांच्या पुतणीवर हल्ला शिंदे गटाचा आमदार धावला मदतीला

एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफीचे आयोजन थेट अंतराळातून, पहा फोटो

रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रवाशांना मारहाण केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. काही प्रवासी जागा मिळवण्यासाठी विठ्ठलवाडी अशा आधीच्या स्थनकावरुन बसून येतात. त्या प्रवाशांवर कारवाई केली पाहिजे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असून ट्रेन उशिराने धावत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी