30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रसमृध्दी महामार्गावरील बस अपघात नव्हे तर हत्या; शिंदे-फडणवीसांवर इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल

समृध्दी महामार्गावरील बस अपघात नव्हे तर हत्या; शिंदे-फडणवीसांवर इम्तियाज जलील यांचा हल्लाबोल

समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या महामार्गाला अपघातांचे ग्रहण लागले असून रात्री उशीरा बुलढाण्याजवळ एका खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन या दुर्घटनेत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर अनेक नेत्यांनी सरकारच्या नाकर्तेपणाकडे बोट दाखवले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जोरदार चपराक लगावली आहे. ”’मी याला अपघात म्हणणार नाही ही तर ही हत्या आहे, आणि ही हत्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली आहे”, असा हल्लाबोल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वर केला आहे.

समृद्धी एक्स्प्रेसवेच्या उद्घाटनाची घाई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना झाली होती. इम्तियाज जलील यांनी एक फोटो ट्वीट करत म्हटले आहे की आपल्या राजकीय स्वार्थासाठी मीडिया इव्हेंट करून समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. त्यासाठी 5 कोटींची कार चालवली आणि आत्ता अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 25 जणांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर करत आहेत. मी याला हत्या म्हणतो. उद्घाटनापूर्वी आवश्यक रस्ता सुरक्षा परवानग्या घेतल्या होत्या का? प्रवाशांना ताजेतवाने करण्यासाठी सिंगल फूड प्लाझा का बांधला गेला नाही? उद्घाटन झाले तेव्हा एकही इंधन केंद्र नव्हते? एक्स्प्रेस वेच्या संपूर्ण भागात स्वच्छतागृह नाही. प्रश्न हा आहे की महामार्ग सुरू करायची काय घाई होती!. असे प्रश्न इम्तियाज जलील सरकारला विचारला आहे.

समृद्धी महामार्गावर झालेल्या या आपघातामध्ये ट्रॅव्हल्स बस दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. बसमध्ये झोपलेल्या प्रवाशांचा आगिमध्ये होरपळून मृत्यू झाला. या अग्नीतांडवात 25 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात झाल्यानंतर जखमी प्रवाशांनी मदत मागितली पण रस्त्यावरुन जाणारी वाहने थांबली नाहीत. बस मध्ये एक लहान मूल आणि महिला काचेवर हात आपटत सुटके साठी याचना करत होती पण कोणीही मदतीला आले नाही आमच्या डोळ्यांदेखतच त्यांचा जळून कोळसा झाला असे एकाने सांगितले. तर या उपघतात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखाची मदत केली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर केंद्र सरकारकडून मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत केली जाणार आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र नोंदी यांनी केली. जखमी प्रवाश्यांचा वैद्यकीय खर्च सरकार करणार आहे.

हे सुद्धा वाचा:

खासगी वाहनांच्या वेगमर्यादेची गंभीर दखल घ्यावी; शरद पवार यांच्या सूचना

बुलढाणा अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल; ट्विट करत व्यक्त केला शोक

डॉक्टर हे देवदूतच!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी