29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयडॉ. अमोल कोल्हे देणार खासदारकीचा राजीनामा; शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचे...

डॉ. अमोल कोल्हे देणार खासदारकीचा राजीनामा; शरद पवार यांच्या सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट

अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पाडत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अनेक आमदार-खासदार उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा देखील समावेश होता. त्यामुळे ते अजित पवार यांच्या सोबत असल्याच्या चर्चा होत होत्या. पण अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत ते शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट केले. या पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ‘ज्योतिषी कधी सगळे विसरायच पण बाप नाही विसरायचा’ असे म्हटल आहे. पण यानंतर आत्ता त्यांनी खासदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे देणार असल्याचे जाहीर केले आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, राजकारणाची विश्वासर्हता, जबाबदारीची नैतिक मूल्य या सगळ्यांचा विषयी मतदारांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. तसेच आपला आतील आवाज म्हणतोय साहेबांसोबतच राहावं, म्हणून मी साहेबांसोबतच राहणार असे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी जे मतदान केल ते एका विचारधारेवर विश्वासावर ठेऊन केले असल्याने मतदारांचा विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी माझा खासदार पदाचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे देणार असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले. अमोल कोल्हे म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेद्वारे इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मला नैतिक मुल्यांसोबत राहणे जास्त योग्य वाटते हे राजकारण पाहता मी खासदारकीचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांची मंगळवारी मुंबई येथे भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सादर करणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा:

राणादाचा शिंदे गटात प्रवेश, अनेक मराठी कलाकारही उपस्थित

शरद पवारांच्या आडून आव्हाडांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीला अजित पवारांचा आक्षेप

9 आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली – जयंत पाटील

रविवारी अजित पवार यांचा शपथविधी झाला ह्या शपथविधीसाठी खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित होते त्यामुळे कोल्हे हे अजित पवार यांच्या सोबत जाणार असल्याची चर्चा होत होती. या चर्चांना फूलस्टॉप देत कोल्हे यांनी ट्वीट करत ते शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट केले. यावर स्पष्टीकरण देते कोल्हे म्हणाले की, मला तिथे काय सुरू होते माहीत नव्हते. माझ्या आवाज मला शरदचंद्रजी पवार यांच्या सोबतच रहाव म्हणून सांगतोय. त्यामुळे मी त्यांच्या सोबतच राहणार आहे. तसेच गेली चार वर्ष आपण शिरूर मतदार संघातील प्रश्नांची मांडणी करत असताना केंद्राच्या पॉलिसीवर, विचारधारेवर टीका करत आहोत आपण विरोधी भूमिका घेतली असताना अचानक आपण कसे बदलू शकतो, हा प्रश्न माझ्या मनात होता. म्हणून मे पवार पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला असे ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी