30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयअजित पवारांनी नव्या मंत्रिमंडळात किती कोटींच्या भ्रष्टाचाराचे टार्गेट ठेवले आहे स्पष्ट करावे;...

अजित पवारांनी नव्या मंत्रिमंडळात किती कोटींच्या भ्रष्टाचाराचे टार्गेट ठेवले आहे स्पष्ट करावे; वंचितचा हल्लाबोल

अजित पवार यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार राज्याचे विरोधीपक्ष नेते होते. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 70 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्यावर वंचित बहुजन आघाडीने फडणवीस, मोदी यांच्यासह अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांनी नव्या मंत्रिमंडळात किती कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे टार्गेट ठेवले आहे हे स्पष्ट करावे असे म्हणत वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी म्हटले आहे.

पाटबंधारे मंत्री असताना अजित पवारांनी 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे अनेक नेते करत होते. परंतु या आरोपाला माफ करण्याचं काम फडणवीस यांनी केलं. त्यानंतर अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील अजित पवारांवर 70 हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र दोन दिवसांमध्ये घडामोडी पाहता मंत्रिमंडळामध्येअजित पवारांना विकासाच्या अजेंड्यावरती सामील करून घेण्याचं काम झालेलं आहे. आणि त्यांचे हे जे काही भ्रष्टाचार आहेत घोटाळे आहेत त्यांना माफ करण्याचं काम फडणवीस यांनी केलेलं आहे. आता नवीन मंत्रिमंडळामध्ये आणखी किती कोटीचा भ्रष्टाचार करण्याचं टार्गेट अजित पवार यांनी ठेवलेलं आहे ते त्यांनी जनतेला स्पष्ट करावं असे रेखा ठाकुर यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

राहुलची कर्तबगारी चीनी दाम्पत्याला आवडली, संगमनेरमध्ये मुलीचे केले कन्यादान

अजित पवारांच्या बैठकीच्या वाटेत अडचणींचे काटे; एमईटीच्या ट्रस्टीचा विरोध

गद्दारी करणाऱ्यांना फोटो वापरण्याचा अधिकार नाही, शरद पवारांचे अजित पवारांना खडेबोल

गेल्या काही दिवसांपूर्वी पाटण्यात विरोधी पक्षांची बैठक झाली होती. या बैठकीला शरद पवार यांच्यासह अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर 70 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यानंतर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत मंत्रिपदाची शपथ घेतली. तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या पवारांच्या विश्वासू साथीदारांनी देखील शरद पवारांची साथ सोडली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यामुळे या नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचे पसंत केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर होत आहे. वंचित बहुजन आघाडीने देखील आज अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी