29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयसध्याचे राजकारण पाहता लोकसभा निवडणुका डिसेंबरमध्ये; काय म्हणाले रोहित पवार वाचा

सध्याचे राजकारण पाहता लोकसभा निवडणुका डिसेंबरमध्ये; काय म्हणाले रोहित पवार वाचा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होत आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आज (बुधवारी) मोठे विधान केले आहे. लोकसभेच्या निवडणुका डिसेंबर 2023 मध्ये लागण्याची शक्यता आहे असे भाकीत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. रोहित पवार यावर म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाच-सहा महिने आधी ईव्हीएम मशीन तपासल्या जातात. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना ईव्हीएम मशीनची तपासणी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डिसेंबर 2023 मध्ये लोकसभा निवडणूक होऊ शकतात याचे हे संकेत आहेत. कारण कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला होता म्हणून ही सर्व प्रक्रिया सुरू झाल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार यांनी भाजपावर हल्लाबोल करत भाजपाने आगामी निवडणुका ध्यानात घेऊन महाराष्ट्रामध्ये बीजेपीचा लोकसभेतील आकडा वाढवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला आहे. कर्नाटक लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला होता, हीच गोष्ट मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यांमध्ये होऊ शकते. यासाठीच ज्या निवडणुका मार्चमध्ये होऊ शकतात त्या डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात येऊ शकतात असे रोहित पवार यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा:

‘ गडी एकटा निघाला, 83 वर्षाचा योद्धा’, शरद पवार गटाकडून मुंबईत जोरदार पोस्टरबाजी

धक्कादायक! मुंबईतील वरळी सी-फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

मुख्यमंत्री नागपूर दौरा अर्धवट सोडून परतल्याने भाजपवरील नाराजीची जोरदार चर्चा

राष्ट्रवादीचे अजित पवार हे बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. आत्ता सरकारमध्ये भाजपा आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते नाराज असल्याचे रोहित पवार म्हणाले. भाजपा राष्ट्रवादीच्या विचारसरणी विरुद्ध मागील अनेक वर्षांपासून लढत आहे आणि आता अचानक सत्तेत संख्याबळ मिळण्यासाठी राष्ट्रवादीला सोबत घेतले त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते नाराज असल्याचे वक्तव्य रोहित पवार यांनी केले. राज्याचे राजकारण खूप खालच्या पातळीवर घसरले आहे. त्यामुळे लोक येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये चांगल्या विचारांना समर्थन देतील आणि आता सत्तेत असलेल्या विरुद्ध लोक मतदान करतील असे रोहित पवार म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी