29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईसायन-चुनाभट्टीकडून चेंबूरकडे जाणार्‍या मार्गावर प्रियदर्शनी जवळ रस्ता खचला, 40 ते 50...

सायन-चुनाभट्टीकडून चेंबूरकडे जाणार्‍या मार्गावर प्रियदर्शनी जवळ रस्ता खचला, 40 ते 50 गाड्यांचे नुकसान

मुंबईमध्ये सायन-चुनाभट्टीकडून चेंबूरकडे जाणार्‍या मार्गावर प्रियदर्शनी जवळ रस्ता खचल्याचा प्रकार समोर आला आहे. रहदारीचा रस्ता खचला असून त्यामध्ये 40-50 गाड्या आत गेल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली आहे. पण यामुळे आजूबाजूच्या भागात खळबळ पसरली आहे. रस्ता जिथे खचला आहे तिथे इमारतीचं काम देखील सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी धोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

प्रियदर्शनी मधील वसंत दादा पाटील इंजिनियर कॉलेज समोरील राहूल नगर दोन इथे एसआरएस बिल्डिंग समोर जागा खचल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यानंतर आजूबाजूच्या नागरिकांना घरातून बाहेर काढत संपूर्ण बिल्डिंग खाली करण्यात आल्या. अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या जागेच्या आत सुमारे 25 फूट जमिनीचा मोठ भाग कोलमंडला आहे. या ढिगाऱ्याखाली आठ ते दहा दुचाकी आणि चार- पाच चारचाकी गाड्या अडकल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलीस, अग्निशमन दल आणि मुंबई महानगरपालिका कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रस्ता खचला असताना एक पांढरी कार खोदलेल्या भागात घसरताना दिसली. गेल्या महिन्यातचं अशीच एक घटना मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचल्याची घटना घडली होती.

हे सुध्दा वाचा:

40 पेक्षा अधिक आमदार बैठकीला उपस्थित; छगन भुजबळ यांचा दावा

सध्याचे राजकारण पाहता लोकसभा निवडणुका डिसेंबरमध्ये; काय म्हणाले रोहित पवार वाचा

धक्कादायक! मुंबईतील वरळी सी-फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी