29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयभुजबळ पवारांना म्हणाले, तेव्हा त्यांना देखील असेच वाईट वाटले असेल

भुजबळ पवारांना म्हणाले, तेव्हा त्यांना देखील असेच वाईट वाटले असेल

महाराष्ट्रात सध्या फुटीचे राजकारण सुरू आहे. आधी शिंदे आणि आत्ता अजित पवार. अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसोबत घेऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या फूटीनंतर अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून आज मुंबईमध्ये दोन वेगवेगळ्या बैठका घेण्यात आल्या. अजित पवार यांच्या बैठकीला शरद पवार यांच्या बैठकीपेक्षा जास्त आमदार उपस्थित आहेत. अजित पवार यांच्या बैठकीमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत. अस म्हणत आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलय असा घणाघात केला आहे.

आजही माझ्या मनात शरद पवारांविषयी प्रेम आहे. जेव्हा मे वसंतदादांना (शिवसेना) तेव्हा त्यांना असाच वाईट वाटल होत. मी बाळासाहेबां सोबत होतो ,मी त्यांना आई वडिलांच्या ठिकाणी मनात होतो. पण 36 लोक राष्ट्रवादीत आले होते. तेव्हा मला सुद्धा येण भाग पडल. तेव्हा तुम्ही मला तिथे थांबण्याचा सल्ला दिल नाही. ज्यावेळी नी शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलो तेव्हा बाळासाहेब आणि मॉसाहेब यांना देखील असंच वाईट वाटल होत. ज्यावेळी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेतळ त्यावेळी गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांनाही असंच वाईट वाटल. या सगळ्याची पुनरावृत्ति झाली आहे, अस भुजबळ यांनी म्हटल आहे.

हे सुद्धा वाचा:

सायन-चुनाभट्टीकडून चेंबूरकडे जाणार्‍या मार्गावर प्रियदर्शनी जवळ रस्ता खचला, 40 ते 50 गाड्यांचे नुकसान

40 पेक्षा अधिक आमदार बैठकीला उपस्थित; छगन भुजबळ यांचा दावा

सध्याचे राजकारण पाहता लोकसभा निवडणुका डिसेंबरमध्ये; काय म्हणाले रोहित पवार वाचा

मुंबई एज्युकेशन ट्रस्टमधील सभागृहात आज अजित पवार गटाच्या आमदार आणि समर्थक मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ शरद पवार यांचा विठ्ठल असा उल्लेख केला शरद पवार यांच्यावर अपार प्रेम आणि श्रद्धा असल्याचा दावा करत आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलय असा आरोप केला आहे. शरद पवार यांच्या निकटवर्तींयामध्ये सध्या बिनकामाच्या बडव्यांनी गर्दी केली आहे अस ते म्हणाले. राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा जे भाषण केल तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयी असंच वक्तव्य केल होत. माझ्या वाद माझ्या विठ्ठलाशी नाहीतर त्यांच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे अस राज ठाकरे शिवसेना सोडताना म्हणाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी