29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeक्रिकेटरिषभ पंतनंतर या भारतीय माजी वेगवान गोलंदाजाचा अपघात, मुलगाही जखमी

रिषभ पंतनंतर या भारतीय माजी वेगवान गोलंदाजाचा अपघात, मुलगाही जखमी

भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार आणि त्याच्या मुलाचा मेरठमध्ये कार अपघात झाला आहे. एका ट्रकने कारला धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. या अपघातात दोघे सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास प्रवीण पांडव नगरहून परतत असताना त्याच्या लँड रोव्हर डिफेंडरला ट्रकने जोरदार धडक दिली. यात प्रवीण आणि त्याचा मुलगा दोघेही थोडक्यात बचावले पण कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

प्रवीण कुमार 4 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मेरठमधील पांडव नगर येथून त्याच्या लँड रोव्हर डिफेंडर वाहनाने येत होते. यानंतर हे वाहन आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ पोहोचले असता त्याचवेळी त्यांच्या वाहनाची कॅंटरला धडक बसली. यानंतर वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात प्रवीण आणि त्याचा मुलगा किरकोळ बचावले. या अपघाताबाबत सीओने सांगितले की, प्रवीण कुमार आणि मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहेत. प्रवीण कुमार यांचे घर मेरठ शहरातील बागपत रोडवर असलेल्या मुलतान नगरमध्ये आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवीण कुमारला भारतीय संघाकडून 68 एकदिवसीय, 10 टी-20 आणि 6 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये प्रवीणने वनडेमध्ये 77, टी-20 मध्ये 8 आणि कसोटीत 27 बळी घेतले आहेत. याशिवाय 119 आयपीएल सामन्यांमध्ये प्रवीण कुमारच्या नावावर 90 बळींची नोंद आहे. मोठ्या प्रमाणावर चेंडू स्विंग करण्याच्या दुर्मिळ क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या, त्याने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाच्या कॉमनवेल्थ बँक मालिका विजयात मोठी भूमिका बजावली होती. 2007 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणारा प्रवीण कुमार आता 36 वर्षांचा झाला आहे. तो भारतासाठी सर्व फॉरमॅट खेळला आहे.

हे सुध्दा वाचा:

भुजबळ पवारांना म्हणाले, तेव्हा त्यांना देखील असेच वाईट वाटले असेल

आणि प्रतिभाताई शरद पवार ढसाढसा रडू लागल्या..

सायन-चुनाभट्टीकडून चेंबूरकडे जाणार्‍या मार्गावर प्रियदर्शनी जवळ रस्ता खचला, 40 ते 50 गाड्यांचे नुकसान

30 डिसेंबर रोजी दिल्ली-डेहराडून महामार्गावर ऋषभ पंतचा कार अपघात झाला होता. त्याची आलिशान कार ही रस्त्याच्या दुभाजकावर आदळली आणि आग लागली असून त्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर मुंबईच्या रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अपघातानंतर बीसीसीआयच्या सूचनेनुसार पंतला जानेवारीत डेहराडूनहून मुंबईला विमानाने नेण्यात आले आणि डॉ दिनशॉ परडीवाला यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी