29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयछगन भुजबळांच्या टीकेला जयंत पाटलांचे तोडीसतोड उत्तर

छगन भुजबळांच्या टीकेला जयंत पाटलांचे तोडीसतोड उत्तर

अजित पवारांच्या फूटीनंतर राष्ट्रवादीमध्ये वातावरण चांगलच तापले आहे. या फुटीनंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट यादोन्ही गटाची बैठकी आज मुंबईमध्ये घेण्यात आल्या अजित पवारांच्या झालेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना बडव्यांनी घेरलंय असे खोचक विधान केले. भुजबळांच्या या विधानाला शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलेय. शरद पवार यांनी अनेकांना संधी दिली. विठ्ठलाच्या बाजूला बडवे आहेत असे सांगितले जात आहे, पण तुम्ही दोन वर्षातून तुरुंगातून आले तेव्हा डोक्यावर पगडी ठेवली, तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का ? ज्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान केला, त्यांच्या मांडीला-मांडी लावून बसला. २०१९ साली उद्धव ठाकरे सरकारचा शिवतीर्थावर शपथविधी होणार होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी दोन जणांची नावे देण्यास सांगितली होती. शरद पवारांनी पहिलं नाव छगन भुजबळांचं दिलं. तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित करत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार गटाच्या बैठकीत बोलत असताना जयंत पाटील यांनी अजित पवार गट आणि भाजपावर निशाणा साधला. या बैठकीत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अनेकांनी हा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. आज काही लोक बाजूला गेले, याचे आम्हाला शल्य आहे. शरद पवारसाहेबांच्या उजवीकडे आणि डावीकडे बसलेले आज नाहीयेत. एक वर्ष झाल तरी अजून मुंबई शहराचा अध्यक्ष नेमला नाही, का नेमला नाही? मुंबई प्रदेशच्या नेमणुका जयंत पाटील करत नाही. मला पाच वर्षे झालीत काही विधाने झाली, मी साहेबांना भेटलो आणि बोललो एकही सुट्टी घेतली नाही आता सुट्टी द्या आता तुम्ही निर्णय घ्याल तो मान्य असेल. मी प्रदेश अध्यक्ष असताना मी फिरलो, मंत्री असताना मी मुंबईत बसून करू शकलो असतो, असे जयंत पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा:

भुजबळ पवारांना म्हणाले, तेव्हा त्यांना देखील असेच वाईट वाटले असेल

आणि प्रतिभाताई शरद पवार ढसाढसा रडू लागल्या..

सायन-चुनाभट्टीकडून चेंबूरकडे जाणार्‍या मार्गावर प्रियदर्शनी जवळ रस्ता खचला, 40 ते 50 गाड्यांचे नुकसान

कितीही संकटे आली तरी शरद पवार साहेबांनी त्याचा सामना केला आहे. 1999 ला सुरू झालेल्या प्रवासाला 24 वर्ष झाली. असे जयंत पाटील म्हणाले. पक्षाची चोरी करणाऱ्यांचा आज थयथयाट सुरू आहे. एका पक्षाची चोरी झाली, जे शिवसेनेसोबत झाले तेच राष्ट्रवादी सोबत सुरू आहे. राज्यात राजकीय पटलावरून नामशेष करण्याची भूमिका असेल तर सर्वानी परत या. वय कितीही झालं तरी या नेत्याचा भारतात दरारा आहे, असे जयंत पाटील म्हणाले. मी शरद पवार साहेबांच्या शब्दाबाहेर जात नाही ही माझी चूक आहे. साहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी पक्षाचे प्रमुख व्हा असे जयंत पाटील यांनी म्हटले. तर यांच्या महाविकास आघाडीला तीन चाकी गाडी म्हणत होते, आता काय? असा सवाल जयंत पाटील यांनी सरकारला उपस्थित केला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी