29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयठाकरे बंधु एकत्र येणार का? मनसेचे अभिजीत पानसे राऊतांच्या भेटीला

ठाकरे बंधु एकत्र येणार का? मनसेचे अभिजीत पानसे राऊतांच्या भेटीला

राज्याच्या राजकारणात सध्या एका मागे एक धक्के मिळत आहेत. शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फूट पडली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यामध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत सोमवारी मनसेची देखील बैठक घेण्यात आली होती. मनसेच्या या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची साथ देऊया असा सुर उमटला होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? असे पोस्टर देखील शिवसेना भवना समोर लावण्यात आले होते. आत्ता यानंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्थाव पाठवला असल्याची महती मिळत आहे. मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादीचे अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकार सोबत गेल्यामुळे मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला गेला असल्याचं सांगितल जात आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी मुंबईमध्ये पोस्टर बाजी करण्यात आली होती. तसेच राज्याच्या राजकारणात स्थिरता यावी यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी मागणी कार्यकर्ते करू लागले. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा:

पाच महिन्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आले अच्छे दिन; मिळाला समाधानकारक भाव

काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार का ? आज मुंबईमध्ये होणार काँग्रेसच्या नेत्यांची बैठक

महिला प्रवासी सुरक्षितेसाठी राज्य आणि रेल्वे पोलिसांनी समन्वयाने काम करावे- उपसभापती डॉ. गोऱ्हे

संजय राऊत यांच्या दैनिक सामानाच्या कार्यालयात मनसेचे अभिजीत पानसरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली यानंतर, राऊत आणि पानसे यांनी भांडुप ते प्रभादेवी असा प्रवास एकाच कारमधून केला. यावेळी युतीबद्दल चर्चा झाल्याची माहीती मिळत आहे. दरम्यान , पानसे आणि राऊत यांच्या भेटी बाबत कोणतीही माहिती नसल्याचे देशपांडे म्हणाले. शिवसेना आणि मनसे युतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. कोणतीही युती अथवा आघाडी एकतर्फी होत नसते. ती दोन्ही बाजूंनी व्हावी लागते. सध्यातरी याबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नाही. असा काही निर्णय असेलच तर तो पक्षप्रमुख राज ठाकरे हेच घेतात आणि घेतील अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी