29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयखुर्चीचा मोह, नाती तोडतो, नैतिकता विसरवतो!

खुर्चीचा मोह, नाती तोडतो, नैतिकता विसरवतो!

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून लोकप्रतिनीधी, पदाधिकाऱ्यांचे ‘आउटगोईंग’ वर्षभरानंतर अद्यापही सुरुच आहे. एकवर्षापूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी उभी फुट पाडली. त्यानंतर शिवसेना मुळ पक्षावर देखील त्यांनी दावा सांगितला. याची न्यायालयीन लढाई अद्याप सुरु असली तरी, पक्षातील अनेकजण त्यांची साथ सोडत आहेत. आज विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांची साथ सोडल्यानंतर युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत त्यांचे नाव न घेता ”खुर्चीचा मोह,नाती तोडतो, नैतिकता विसरवतो!” अशी टीका केली आहे.

काही दिवसांपुर्वी विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आज विधान परिषदेच्या उपसभापती आणि जेष्ठ नेत्या निलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर चाळीस आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री झाले. हा सत्तासंघर्ष अजून देखील सुरुच आहे. मात्र गेल्यावर्षभरात शिंदे याच्या शिवसेनेत अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आमदारांचे इनकमिंग सुरुच आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर संकटाचा पहाड दिवसेंदिवस वाढतच आहे. दुसरीकडे शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा पधानसभा अध्यक्षांकडे पडून आहे. त्यावर निर्णय होत नसल्याने उद्धव ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
एकीकडे हा संघर्ष सुरु असला तरी एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटातील लोकांना आपल्या गटात आणण्याचा एककलमी कार्यक्रम सुरुच आहे. आज ठाकरे गटाच्या विश्सासू समजल्या जाणाऱ्या आणि विधान परिषदेच्या उपसभापतींनीच एकनाथ शिंदे यांच्या गटात जाहिर प्रवेश केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत निलम गोऱ्हे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, स्वार्थी विरुद्ध प्रामाणिक विचारसरणी अशी ही लढाई आहे! एकाच व्यक्तीला ४ वेळा विधान परिषदेवर जाण्याची संधी उद्धवसाहेबांनी दिल्यावरही, २१ वर्ष तिथे असूनही, २ वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही… एकच गाणं आठवतं, यह मोह मोह के धागे… खुर्चीचा मोह, नाती तोडतो, नैतिकता विसरवतो!

रविवारी राष्ट्रवादीत मोठी दुफळी होऊन अजित पवार यांनी सत्तेसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ज्या शिवसेना आमदारांनी राष्ट्रवादीवर टीका केली त्याच राष्ट्रवादीतील आमदारांसोबत आता त्यांना काम करावे लागणार असल्याची टीका ठाकरे गटाकडून केली जात होती. तसेच एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार असून शिंदे गटाचे 17 ते 18 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जात होता. शिंदे यांची साथ सोडून अद्याप एकाही आमदाराने ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केलेला नाही. मात्र ठाकरे यांच्या गटातून शिंदे गटात आमदार जात आहेत. त्यामुळे ठाकरे गटासाठी अजून तरी ही लढाई मोठी असल्याची आता होत आहे.
हे सुद्धा वाचा 
राहुल गांधींवरील कारवाईविरोधात, सर्वोच्च न्यायालयात जाऊ: नाना पटोले
राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टाकडून दिलासा नाही; आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार
महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपुर्व पेच;निलम गोह्रे यांची तक्रार कोणाकडे करणार ?

गेले वर्षभर आदित्य ठाकरे या राजकीय रणांगणात जोमाने लढत आहेत. आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीला राज्यभर दौरा करुन शिवसैनिकांची सहानुभुती मिळवली. सत्ता गेल्यानंतर शिवसैनिकांची मोठी सहानुभूती ठाकरेंना जरी मिळाली असली तरी आमदारांना मात्र सत्तेसोबत राहणे भल्याचे वाटत असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी