27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयशिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस जारी;...

शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस जारी; आमदारांच्या आपात्रतेबाबत लवकरच निर्णय

राज्याच्या राजकारणात सध्या मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 समर्थक आमदार आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. आत्ता शिवसेना शिंदे गटाच्या 16 आमदारांविरुद्धच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावर लवकरच निर्णय घेणार आहेत. त्यातच आता शिवसेनेच्या 40 आमदार आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्रतेसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. विधीमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

अपात्रतेविरोधातील कारवाईटाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. राहुल नार्वेकर यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत मिळाली असून आपत्रतेच्या याचिकांवर लवकरच सुनावणी घेणार असल्याचे सांगितले होते.

ठाकरे गटाने या आठवड्याच्या सुरवातीलाच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आमदारांच्या अपात्रते बाबत लवकर निर्णय घेण्यासाठी अध्यक्षांना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली होती. आमदार सुनील प्रभू यांनी मुख्य व्हिप म्हणून 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि इतर 15 बंडखोर आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केली होती. नंतर प्रभू यांनी या महिन्यात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजीच्या निकालात विधानसभा अध्यक्षांना याचिकांवर मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. तरीही यावर निर्णय होत नसल्याने विधानसभा अध्यक्ष जाणून बुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. यावर राहुल नार्वेकर यांनी, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत आपल्याला मिळाली असून आपत्रतेच्या याचिकांवर लवकरच सुनावणी घेणार असल्याचे सांगितले होते

हे सुद्धा वाचा:

शरद पवार यांच्यासोबत 44 आमदार; पवारांच्या कट्टर समर्थकाचा दावा

शिंदे गटाच्या आमदार मंडळींची नाराजी दूर करण्याचा फॉर्म्युला ठरला

खुर्चीचा मोह, नाती तोडतो, नैतिकता विसरवतो!

शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात याव यासाठी ठाकरे गटाची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल आहे. यासाठी ठाकरे गटाकडून अनेकदा स्मरण पत्र ही देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 90 दिवसांच्या विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आत्ता शिवसेनेच्या 40 आमदार आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच लवकरच ह्या निर्णयावर सुनावणी करणार आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी