29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीय...तर मी राजकारण सोडेन, जितेंद्र आव्हाडांची अजितदादांना भावनिक साद

…तर मी राजकारण सोडेन, जितेंद्र आव्हाडांची अजितदादांना भावनिक साद

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शिंदे -फडणवीस सरकारमध्ये जाऊन बसले. यानंतर अजित पवार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत छगन भुजबळ यांनी विठ्ठलाला बडव्यांनी घेरल आहे अस विधान केले होते. यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तुम्ही म्हणताय या बडव्यांनी साहेबांना घेरलंय, त्यांच्यामुळे सगळं झालंय. तर ठीक आहे मी पवार साहेबांच्या जवळपास दिसणार नाही. तेथे फिरकणारही नाही. मात्र तुम्ही परत या. अजितदादांनी परत यावं मी राजकारण सोडेल, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना भावनिक साद घातली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे की, अजितदादासोबत नेतेमंडळी गेले आहेत त्यांनी परत यावं. मी जयंत पाटील यांना देखील बाजूला व्हायला सांगेल. आम्ही जर विठ्ठलाभोवतीचे बडवे असू तर आम्हाला यापुढे काहीही नको, मी दूर कुठेतरी निघून जातो. आम्ही जर बडवे असून तर बाजूला होऊ. मी शरद पवार यांच्या गुप्त किंवा मुख्य बैठकांना कधीच नसायचो. माझी इच्छाही नसायची. ते जो निर्णय घेतील त्यांच्यासोबतच राहायचे. मात्र तुम्ही शरद पवारांना या वयात त्रास देऊ नका. त्यांना निवृत्त व्हा असं म्हणंण बरोबर नाही. ज्या पद्धतीनं त्यांच्याबाबत वक्तव्य केली गेली ते बरोबर नाहीत.

हे सुध्दा वाचा:

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी साईबांबाचे दर्शन घेत, घेतला प्रसादाचा आस्वाद

शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस जारी; आमदारांच्या आपात्रतेबाबत लवकरच निर्णय

शरद पवार यांच्यासोबत 44 आमदार; पवारांच्या कट्टर समर्थकाचा दावा

शरद पवार यांनी पहिली सभा नाशिक येथील येवला येथे सभा घेणार आहेत. छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधील येवल्यात संध्याकाळी चार वाजता सभा पार पडणार आहे. या सभेत शरद पवार काय बोलणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. शरद पवार समर्थकच नाही तर ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील मैदानात उतरले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी