27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयशरद पवार यांचे मुंबई-नाशिक प्रवासादरम्यान कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

शरद पवार यांचे मुंबई-नाशिक प्रवासादरम्यान कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

अजित पवार आणि त्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीत केलेल्या बंडानंतर नाशिक जिल्ह्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सभा घेत आहेत. संध्याकाळी चार वाजता ही सभा पार पडणार आहे. शरद पवार यांचा ताफा आज सकाळीच नाशिककडे रवाना झाला. मुंबईपासून नाशिकपर्यंत शरद पवारांच्या स्वागताला गर्दी पाहायला मिळत आहे. जोरदार घोषणाबाजी करत शरद पवार यांचे स्वागत करण्यात आले. ठाण्यामध्ये राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ढोल ताशे आणि फटाक्यांच्या गजरात जोरदार स्वागत केले.

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर शरद पवार यांचा हा पहिलाच नाशिक दौरा आहे. या दौर्‍यामध्ये पवार यांच्यासोबत राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे,आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे सहभागी झाले आहेत. शरद पवार यांच्या येवला येथील सभेला शिवसेना ठाकरे गटाचे पाठबळ मिळत आहे. ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दरोडे आणि किशोर दरोडे या भावांनी सभेच्या तयारीसाठी कंबर कसली आहे.

हे सुद्धा वाचा:

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी साईबांबाचे दर्शन घेत, घेतला प्रसादाचा आस्वाद

शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस जारी; आमदारांच्या आपात्रतेबाबत लवकरच निर्णय

शरद पवार यांच्यासोबत 44 आमदार; पवारांच्या कट्टर समर्थकाचा दावा

नाशिकपासून ते येवलापर्यंत ठिकठिकाणी शरद पवार यांचे स्वागत करण्यात येत आहे. या सभेसाठी शरद पवार समर्थकच नाही तर ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील मैदानात उतरले आहेत. ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधत, शरद पवार यांची सभा दूरगामी परिमाण करणारी ठरणार असून आगामी निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. त्याबरोबरच शरद पवार यांच्या आजच्या सभेला 5 ते 7 हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी