27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीय'एक सही संतापाची'; मनसेच्या आंदोलनाला मुंबईत उदंड प्रतिसाद

‘एक सही संतापाची’; मनसेच्या आंदोलनाला मुंबईत उदंड प्रतिसाद

राजकारणी मंडळींनी राज्यात राजकारणाचा चिखल केला आहे. उत्तर प्रदेश, बिहारच्या राजकारणाला आपण हसत होतो. पण सध्याच्या राजकारणामुळे राज्याची छी: थू देशभर होत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी मनसे युवासेना अध्यक्ष अमित ठाकरे यांनी एक सही संतापाची.. हे सही अभियान सुरू करून जनतेच्या संतापला वाट मोकळी करून दिली आहे. मुंबईत या अभियानाने गती घेतली आहे. दक्षिण मुंबईत सीएसएमटी रेल्वे स्टेशन परिसरात हे अभियान राबवण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक 225 यांनी हे अभियान राबवले. विभाग अध्यक्ष शेखर गव्हाणे, सचिव राजेश कोंबेकर, महिला विभाग सचिव मनिषा राणे, महिला विभाग अध्यक्ष सुवर्णा गोताड, महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना उपसरचिटणीस अमोल बिळासकर यांनी हे अभियान यशस्वी करून दाखवले.

गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार सोबत घेऊन शिवसेनेत बंड केले होते. तेव्हापासून राज्याच्या राजकारणाची सुसंस्कृततेची घडी विस्कटली. तेव्हापासून दोन्ही (एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट) शिवसेनेत कमालीचे वाजले आहे. खासदार संजय राऊत सकाळी सकाळी वृत्त वाहिनींना बाइट देतात आमदार मग दिवसभर त्यांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे गटाचे आमदार, भाजपचे आमदार नितेश राणे हे तर बोलत असतात, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही प्रतिक्रिया देत असल्याने यात आणखी तेल पडते.

हे सुध्दा वाचा:

वयावर जाल तर किंमत चुकवावी लागेल; शरद पवारांचा अजित पवारांना सज्जड इशारा

आज महाराष्ट्रात ईडी नावाचे नवे देवस्थान; अमोल कोल्हे यांचा येवल्यातून घणाघात

‘में न टायर्ड हूं, ना रिटायर्ट हूं, मैं तो फायर हूं’! म्हणत शरद पवारांनी केली नव्या इनिंगची सुरुवात

रविवारी अजित पवार यांनी काका शरद पवार यांना अखेरचा सलाम करत भाजपची वाट धरली. त्यामुळे या गोंधळात आणखी भर पडली आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. मोठी पाती (शरद पवार) आणि छोटी पाती (अजित पवार ) आपल्या आपल्या तलवारीला धार लावत आहेत. या राजकीय कुस्तीच्या सामन्याला सामान्य जनता कंटाळली आहे. त्यांचा दबलेला आवाज सरकार दरबारी पोहचवण्यासाठी मनसे यांनी हे सही आंदोलन सुरू केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी