27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रपियो लेकिन रखो हिसाब... रविवारी गटारीचा जल्लोष

पियो लेकिन रखो हिसाब… रविवारी गटारीचा जल्लोष

हुई मेहंगी बहोतही शराब के थोडी थोडी पिया करो
पियो लेकिन रखो हिसाब की थोडी थोडी पिया करो.. ‘

पंकज उदास यांच्या या गझलेने ‘टाककाम’ करणाऱ्या मंडळींना एकेकाळी रिझवले होते. गटारी जवळ आल्यावर अनेकांच्या ओठावर ही गझल रेंगाळते.. सोमवार 17 जुलै रोजी आषाढी गटारी अमावस्या आहे. त्यात श्रावण आणि अधिक महिना आल्याने यंदाच्या रविवारी 9 तारखेलाच गटारीचा बेत आखला गेला आहे, त्यासाठी शनिवारपासून जोरदार तयारी अनेकांनी सुरू केली आहे. रविवारची मंतरलेल्या पाण्यासाठीची बैठक हॉटेलमध्ये करायची, सोसायटीच्या गच्चीवर की निसर्गरम्य ठिकाणी याचे बेत रचले गेले असून रविवारीच राष्ट्रीय गटारी साजरी उरकण्याचे ठरले आहे.

चिकन-मटणवाल्याकडे अ‍ॅडव्हान्स बुकींग झाले आहे. शनिवारपासून दारुच्या दुकानांत मोठी गर्दी लोटत आहे. हजारो कोंबड्या-बकर्‍यांचा खुर्दा तर दारुचाही महापूर लोटणार असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र या सर्व परिस्थितीवर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचा कडक वॉच असणार आहे. कोणीही वाहतुकीचे नियम तोडू नये, बनावट दारुची विक्री होवू नये, यासाठी पोलिस डोळ्यात तेल घालून आहेत. धबधबे, तलाव, नद्या आदी ठिकाणी गर्दी होऊ नये याची काळजी त्या त्या जिल्हा प्रशासनाने घेणे आवश्यक करण्यात आले आहे. विशेषतः गृह विभागाने तसे आदेश दिले आहेत.

यंदा पावसाचे ओढ दिल्याने वातावरणात दमटपणा होता. पण दहा दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने वातावरणात ‘गारवा’ निर्माण झाल्याने ‘दारवा’ पिण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून अनेकांना धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणे खुणावू लागले आहेत. धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणांचे आकर्षण असलेल्या निसर्गप्रेमींना 9 आणि 16 तारखेचा रविवार गटारीसाठी आणि पर्यटनासाठी बुक केलेला आहे. आषाढ अमावस्या सोमवार 17 जुलैला असल्याने दोन आठवड्यात पर्यटनाचे प्लॅन अनेकांनी आखले आहेत. अनेक मंडळे, मित्र मंडळी ग्रुपने पावसाळी पिकनिकसाठी सज्ज झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

एका नावात घोळ झाला, माझा अंदाज चुकला; शरद पवारांनी येवलेकरांची मागितली माफी

‘एक सही संतापाची’; मनसेच्या आंदोलनाला मुंबईत उदंड प्रतिसाद

वयावर जाल तर किंमत चुकवावी लागेल; शरद पवारांचा अजित पवारांना सज्जड इशारा  

त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील येऊर, संजय गांधी नॅशनल पार्क, पाणखंडा, माळशेज घाट, कसारा घाट, शहापूरातील आजोबा धबधबा, जांभे डॅम, भातसा डॅम, चोंढे घाटघर डॅम, मुरबाडातील सिद्धगड, नाणेघाट, थितबी पर्यटन केंद्र, पळूचा धबधबा, पालघरात जव्हार, दाभोसा, नवी मुंबईतील गवळीदेव, पांडवकडा, रायगडात वांगणीतील भगिरथ धबधबा, कर्जतमधील पळसदरी, भिवपुरी आषाणे, जव्हार मधील अनेक निसर्गरम्य ठिकाणे, पनवेलमधील आदई, सुधागडातील कोंडगाव, पडसरे, खवली घपकीचा धबधबा, उद्धर, सिद्धेश्वर, राजखलाटी, भिरा डॅम तर विविध ठिकाणचे वॉटर रिसॉर्ट आदी ठिकाणी जाण्याचा प्लान एक आठवडा आधीच आखला गेला आहे. त्यातच घरी गटारी करणार्‍यांचीही चिकन-मटण शॉप आणि वाईन शॉपवर गर्दी लोटणार आहे. पियो लेकिन रखो हिसाब, थोडी थोडी पिया करो.. असे म्हणत रविवारी ग्लासला ग्लास भिडणार आहे. चॉकलेटी रंगात ग्लासही न्हाऊन निघणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी