27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयअजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचा नाशिक जिल्हयावर फोकस; जिल्ह्यात करणार नवीन नियुक्त्या

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचा नाशिक जिल्हयावर फोकस; जिल्ह्यात करणार नवीन नियुक्त्या

शरद पवार यांची येवलायेथे सभा पार पडली. छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यातील सभेनंतर शरद पवार हे पक्ष बांधणी वर लक्ष देत असल्याची माहिती समोर येत आहे. येवला येथे सभा घेत त्यांनी नाशिक जिल्हयावर फोकस करण्याचे ठरवले आहे. मुंबईमध्ये राहून नाशिकची रणनीती आखत असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी चे बरेच नेते अजित पवार यांच्या सोबत सत्तेत जाऊन बसले आत्ता शरद पवार त्यांच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यां सोबत समोरासमोर बसून चर्चा करत आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यात लवकरच नवीन नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत फुट पडली यानंतर शरद पवार यांची पहिली सभा येवल्यात पार पडली या सभेत शरद पवारांनी बंडखोरांना इशारा देत चांगलेच खडे बोल सुनावले होते. पवारांच्या येवल्यामध्ये घेतलेल्या या सभेला भुजबळांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले होते. यानंतर दोन्ही गटांकडुन काय पाऊल उचलले जाते यावर सर्वांचे लक्ष असतानाच आत्ता शरद पवारांनी पक्ष बांधणीची पुढची रणनीती आखायला सुरवात केली आहे.

येवला येथे झालेल्या सभेत काही कार्यकर्त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. या सभेनंतर शरद पवार यांच्या सोबत मतदारसंघातील जुने कार्यकर्ते असल्याचे दिसून आले. या कार्यकर्त्यांना मुंबईमध्ये बोलावून त्यांच्याशी समोरासमोर बसून चर्चा केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील कोंडाजी मामा आव्हाड यांच्यासोबत राहून पक्षाची पुनर्बांधणी करा असे आव्हान शरद पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादीतील फुटी नंतर अजित पवारांसोबत कोणत्या तालुक्यातील कीती कार्यकर्ते गेले याचा आढावा शरद पवार घेत आहेत. जे नेते शरद पवार यांच्या सोबत आहेत त्यांच्यातून अनेकांच्या जिल्हयावर पुढील दोन ते तीन दिवसात नियुक्त्या होणार असल्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा:

मंत्रिमंडळ विस्तार: कदम, शिरसाट, गोगावले, दरेकर, शेलार, लाड यांची नावे चर्चेत

अजित पवार यांना अर्थखाते मिळणार की दुसरे मलाईदार खाते !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार आणि शरद पवार येणार एकाच स्टेजवर

तसेच शरद पवार यांच्या येवला येथील सभेत पवारांनी बंडखोरांची चांगलीच खरडपट्टी काढली. यानंतर छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली असता त्यांना उत्तर सभा घेणार का? असा प्रश्न विचारलं असता लवकरच अजित पवार गटकडून उत्तर सभा घेण्यात येईल असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी