29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयकाका-पुतण्या दिलजमाईसाठी पवार कुटुंब सरसावले

काका-पुतण्या दिलजमाईसाठी पवार कुटुंब सरसावले

अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या विरोधात बंड केल्याने, तसेच जाहीर सभेत शरद पवार यांचे वय काढल्याने अजित पवार समाज माध्यमात ट्रोल होत आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या बंडाने पवार कुटुंब हादरले आहे. वर वर हे कुटुंब शांत वाटत असेल तरी अजित पवार यांचे बंड कुटुंबाला पसंत नाही. फक्त ह्या कुटुंबातील कोणीही खासगी बाबीवर टिप्पणी केली नाही. त्यामुळे बाहेर पवार कुटुंब शांत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, काका पुतण्या मध्ये दिलजमाई करण्यासाठी आता घरातील सदस्य पुढे सरसावले आहेत. अजित पवार यांचे पुतणे आणि श्रीनिवास पवार यांचा पुत्र युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या भेटीला वाय बी चव्हाण सेंटरमध्ये गेले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार हे श्रीनिवास पवार यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली. श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे सख्खे मोठे बंधू आहेत. दरम्यान दोन्ही भेटींचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

सध्या अजित पवार आणि शरद पवार यांचे राजकीय मार्ग वेगळे झाले आहेत. अजित पवार यांनी गेल्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसह शिंदे फडवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले तर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेला आता आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. या आठवडाभरात अजित पवार आणि शरद पवार यांनी एकमेकांवर वैयक्तिक टीकाटिप्पणी देखील केली. त्यातच आता या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दोन्ही भेटींच्या टायमिंगची चर्चा
याआधी 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी झाला होता, त्यावेळी कुटुंबातील सदस्यांनीच अजित पवार यांची मनधरणी करुन त्यांना परत आणलं होतं. आता तशी परिस्थितीत नसली तरी ज्यावेळी अजित पवार हे आपले मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या भेटीसाठी जातात त्याचवेळी त्यांचे पुत्र युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचतात. त्यामुळे या भेटींचा टायमिंग पाहता कुटुंबामध्ये काही बोलणी किंवा चर्चा सुरु आहे का असे तर्कवितर्क लढवले जात आहे. दोन्ही भेटी एकाच वेळी होत असल्यामुळे त्याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा:

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचा नाशिक जिल्हयावर फोकस; जिल्ह्यात करणार नवीन नियुक्त्या

मंत्रिमंडळ विस्तार: कदम, शिरसाट, गोगावले, दरेकर, शेलार, लाड यांची नावे चर्चेत

अजित पवार यांना अर्थखाते मिळणार की दुसरे मलाईदार खाते !

पहाटेच्या शपथविधीच्या वेळीही अजित पवार हे श्रीनिवास पवार यांच्या घरी होते. तिथेच त्यांच्या मनधरणी केली जात होती. श्रीनिवास पवार यांच्याच माध्यमातून अजित पवार यांच्याशी संपर्क झाला होता. अजित पवार यांनी वेगळा गट केल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संबंध काहीसे बिघडले आहेत. त्यामुळे या भेटीनंतर जर वैयक्तिक संबंध सुधारले तर राजकारणातील संबंध सुधारतील का हे पाहावं लागेल. पण ज्या पुतण्याला लहानाचे मोठे केले त्यानेच पक्षात बंड करून पक्षावर डावा करायला लागला हे शरद पवार यांना आवडले नाही. त्यातच ५ जुलै रोजी अजित पवार यांनी भाषणात पवार यांच्या अनेक खेळी, राजकारणाची कुंडली मांडली. पण अजित पवार यांनी थेट पवार यांचे वय काढल्याने ये कोणाला आवडले नव्हते. आता शरद पवार नव्याने पक्ष बांधणीसाठी रस्त्यावर उतरत असल्याने ८३ वर्षाच्या पवार यांच्या विषयी जनतेत सहानभुती वाढतच चालली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी