27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रदहीहंडी उत्सवाची वेळ रात्री 12 पर्यंत करा; राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची उपमुख्यमंत्री अजित...

दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री 12 पर्यंत करा; राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी

राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री 12 पर्यंत करण्यात यावी आणि गोपालकालाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच दहीहंडी मंडळावर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा शहराध्यक्ष आनंद परांजपे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्यासह गोविंद मंडळांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देवगिरी येथे भेट घेऊन निवेदन दिले.

या निवेदनात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बालगोपाळांचा विमा उतरवण्यात यावा. दहीहंडी खेळाला साहसी दर्जा देण्यात आला आहे परंतु याबाबत सरकारमार्फत उपाययोजना झालेली नाही तरी साहसी खेळासाठी आपण पुढाकार घेऊन सरकार व दहीहंडी पथकांमध्ये समन्वय साधून या साहसी खेळासाठी स्पर्धा आयोजित करण्यात यावी. आयोजकांवर ज्या जाचक अटी लादण्यात आल्या आहेत त्या शिथील कराव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

हे सुध्दा वाचा:

शेतकऱ्याचं खळं लुटण्याचं काम शरद पवारांनी केलं – सदाभाऊ खोत यांची टीका

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठली !

काका-पुतण्या दिलजमाईसाठी पवार कुटुंब सरसावले

30 वर्षापूर्वी मुंबईतील आयडीएलची दहीहंडी उंचीमुळे प्रसिद्ध होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी संघर्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात हा दहीकाला उत्सव ग्लोबल केला. स्पेनची अनेक मंडळी हा उत्सव पहायला यायची. नंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी हिंदी आणि मराठी सिने कलाकार आणून हा उत्सव साजरा करायला लागले. एकुणात हा सण ग्लोबल आणि व्यावसाईक करण्याचे श्रेय ठाण्याकडे जाते. पण आठ आणि नऊ थराची हंडी फोडताना मानवी मनोरे पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळून अनेकजण जायबंदी होतात. काही गोविंदा जबर जखमी होऊन त्यांचा मरणही पावले. एकनाथ शिंदे महाविकास आघाडीत असताना त्यांनी जखमी आणि मरण आलेल्या गोविंदाना सरकारी मदतही मिळवून दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी