27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयशिंदे-फडणवीस सरकार कधीही कोसळू शकते, शिंदेंसोबतच्या आमदाराचा खळबळजनक दावा

शिंदे-फडणवीस सरकार कधीही कोसळू शकते, शिंदेंसोबतच्या आमदाराचा खळबळजनक दावा

वर्षभरापूर्वी महाविकास आघाडीला टांग देऊन ठाकरे सरकारमधील अनेक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. अशा गेलेल्यामध्ये गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभूराज देसाई, बच्चू कडू आदींचा समावेश होता. पण अचलपूरचे अनेक वर्ष आमदार असलेल्या बच्चू कडूंचा राज्य मंत्रिमंडळात अजून विचार न झाल्याने ते नाराज आहेत. म्हणूनच की काय हे सरकार कधीही कोसळू शकते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्राच्या जो शपथविधी झाला याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधी दिली नसावी. त्यांना वेळेवर सांगण्यात आले असावे त्यामुळे आमच्या शपथविधीचा विचार झाला नाही असा धक्कदायक दावा बच्चू कडू यांनी केली. आमच्या गटातील आमदारांना अजित पवार हे अर्थमंत्री नको आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असतांना निधीची पळवापळव केली म्हणून आम्ही इकडे आलो होता. अजित पवार यांची आमच्या मतदारसंघात आम्ही बिलकुल ढळाढवळ सहन करणार नाही. तीन इंजिनचे सरकार आहे हे मजबूत पण राहू शकते व कधीही कोसळू शकते. असेही त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा:

नितेश राणेंच्या विरोधात पुण्यात तृतीयपंथीयांचे आंदोलन

अर्थखात्यावर अडले विस्ताराचे घोडे; शिवसेना-भाजपाची 9 खाती अजित पवार गटाला मिळणार

सप्तशृंगी गड घाटात बस 400 फूट दरीत कोसळली; अपघातात एकाचा मृत्यू

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेल्या आमदारांनी आम्हाला विकास निधी देताना अजित पवार हात आखडता घेत होते, असा आरोप केला होता. भाजप बरोबर आल्याने निधीची कमतरता राहणार नाही असे शिंदे गटाच्या आमदारांना वाटत होते. पण २ जुलै रोजी अजित पवार यांनी आठ मंत्र्यासोबत शपथ घेतली तेव्हाच शिंदे गट चिंतेत होता. अजित पवार यांना अर्थमंत्री करू नका असा आग्रह शिवसेनेचे आमदार करत आहेत. शिवाय शिवसेना एकनाथ गटाच्या दोन मंत्र्यांची खाती काढून ती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास विरोध होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आज सगळे सरकारी कार्यक्रम रद्द करून, वर्षा निवासस्थानी फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करण्यास बसले आहेत. संध्याकाळपर्यंत हा तिढा सुटेल, असे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी