27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर लवकरच एअर अॅम्ब्युलन्स सेवा; हेलिकॉप्टरने अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणार

समृद्धी महामार्गावर लवकरच एअर अॅम्ब्युलन्स सेवा; हेलिकॉप्टरने अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणार

समृद्धी महामार्ग हा 55 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प दहा जिल्ह्यातील 390 गावांना जोडतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. समृद्धी महामार्ग लोकांसाठी सुरू झाल्या पासून या महामार्गावर आपघातांचे सत्र सुरू झाले आहे. या आपघातांमध्ये अनेक जण जखमी झाले तर अनेकांना जीव गमवावा लागला. आपघातांच्या या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर लवकरच एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.

समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने वैदकीय मदत मिळावी, यासाठी शिंदे-फडणवीस सरकार एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करणार आहे. यासाठी सरकारने अनेक हेलिकॉप्टर कंपन्याशी बोलणी सुरू आहे. हेलिकॉप्टर कंपनीशी करार झाल्यानंतर समृद्धी महामार्ग अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना हेलिकॉप्टरने तातडीने रुग्णालयात दाखल केल जाईल. यासाठी नागपूर ते मुंबई दरम्यानच्या खासगी तसंच महत्वाच्या हॉस्पिटलसोबत राज्य सरकार करार करणार आहे.

हे सुध्दा वाचा:

शिंदे-फडणवीस सरकार कधीही कोसळू शकते, शिंदेंसोबतच्या आमदाराचा खळबळजनक दावा

नितेश राणेंच्या विरोधात पुण्यात तृतीयपंथीयांचे आंदोलन

अर्थखात्यावर अडले विस्ताराचे घोडे; शिवसेना-भाजपाची 9 खाती अजित पवार गटाला मिळणार

काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये जखमींना घटनास्थळी मदत न मिळाली नाही. यामुळे अपघातात 26 जणांचा बळी गेला. तसेच महामार्गावर कुठेही ब्रेक पॉइंट नसल्याने चालक वाहन चालवताना रोड हिप्नोसिसचे बळी ठरत आहेत. सात महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरू आहे. यामुळे विरोधी पक्षांकडून समृद्धी महामार्गावर होत असलेल्या आपघातांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आत्ता सरकारने एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी