27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयजिल्हे पिंजून काढा ! पडझड झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार...

जिल्हे पिंजून काढा ! पडझड झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवे मिशन

अजित पवार यांनी पक्षाशी उभे वैर घेतल्याने काहीशी पडझड झालेल्या राष्ट्रवादीत शरद पवार गटाने ‘मोठे साहेब’ यांच्या आदेशाने जिल्हे पिंजून काढा ! हे मिशन सुरू केले आहे. या अंतर्गत सध्या कोण कोणाच्या बाजूने आहे, याचा सर्व्हे सुरू आहे. शरद पवार यांच्यासोबत जे आहेत त्यांची तालुकानिहाय यादी केली जात आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनंतर पदाधिकारी ‘करो या मरो’ त्वेषाने कामाला लागले आहेत, गद्दारांना धडा शिकवणारच असा निर्धार पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांचे राज्याच्या राजकारणात वजन वाढतच चालले होते, ही बाब हुशार अजित पवार यांनी हेरली. फक्त ते संधीची वाट पाहत होते. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर शरद पवार यांनी केंद्रीय आणि राज्य स्तरीय कार्यकारणी जाहीर केली. ही कार्यकारणी जाहीर होताच अजित पवार यांची देहबोली खूप काही सांगून गेली. पाण्याच्या रिकाम्या बाटलीसोबतचे व्हिडिओ वायरल झाले होते. तेव्हाच अजित पवार काका शरद पवार यांच्यापासून मनाने तुटले. हा सांधा अद्याप जोडता आलेला नाही. पण यात शरद पवार यांना मानणारे काहीसे दुखी झाले. शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे गुरुपौर्णिमा या दिवशी दर्शन कामाला लागले. नंतर दोन्ही पवार यांच्या मुंबईत सभा झाल्या. अजित पवार यांनी काकाने (शरद पवार) आजपर्यंत कसे राजकारण केले, याचे किस्से सांगून काकाचे वय काढले. तेच दोन्ही गटातल्या आमदार मंडळींना आवडले नाही. त्यामुळेच की काय शरद पवार यांच्या गटात जायचे की अजित पवार यांच्या अशा द्विधा मनस्थितीत हे आमदार अडकले आहेत. त्यामुळेच सध्या कोण कोणाच्या बाजूने आहे, याचा सर्व्हे शरद पवार गटाकडून सुरू आहे.

अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादीत पडझड झाली आहे, त्यामुळे संघटनात्मक विस्तारासाठी पक्षाला खूप काम करावे लागणार आहे. त्यासाठी खुद्द शरद पवार यांनीच लक्ष घातले आहे. त्यांच्या सुचनेनुसार स्थानिक पदाधिकारी जिल्हे पिंजून काढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा उद्यापासून बैठकाचा धडाका सुरू होणार आहे. यासंदर्भात पहिली बैठक उद्या त्र्यंबकेश्वरमध्ये होणार आहे. त्र्यंबकेश्वरचे दर्शन देऊन शरद पवार गट पक्ष बांधणीच्या कामाला सुरुवात करणार आहेत. त्र्यंबकेश्वरनंतर पेठ, हरसूल, सुरगाणा, कळवण अशा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बैठका घेणार आहेत. अजित पवार गेल्यानंतर जे नेते शरद पवारांसोबत राहिले, त्यामध्ये माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांचा समावेश आहे. देशमुख आता विदर्भात संघटना बांधणीसाठी फिरणार आहेत.

हे सुद्धा वाचा:

समृद्धी महामार्गावर लवकरच एअर अॅम्ब्युलन्स सेवा; हेलिकॉप्टरने अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळणार

शिंदे-फडणवीस सरकार कधीही कोसळू शकते, शिंदेंसोबतच्या आमदाराचा खळबळजनक दावा

नितेश राणेंच्या विरोधात पुण्यात तृतीयपंथीयांचे आंदोलन

पहिल्या टप्प्यात विदर्भातील वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशीम जिल्ह्यात दौरा करून कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. नवीन जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. कार्यकर्त्यांनी जमा केलेले शपथपत्र एकत्र करणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात विदर्भाच्या इतरही जिल्‍ह्यांत जाणार असल्याचे अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी आहोत, असं शपथपत्र कार्यकर्त्यांकडून घेतले जात आहेत. या दौऱ्यात कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार आहे. त्यानंतर जिल्हाध्यक्ष नेमले जाणार आहेत, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. पक्ष म्हणून सर्व कार्यालय ट्रस्टच्या नावाने केलेय. यासाठी प्रफुल्ल पटेल यांनीच पुढाकार घेतला होता, असेही ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी