27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeआरोग्य60 वर्षात वर्षांचे रेकॉर्ड केवळ नऊ वर्षात मोडले; मेडिकल कॉलेजच्या उभारणीवरुन गिरीश...

60 वर्षात वर्षांचे रेकॉर्ड केवळ नऊ वर्षात मोडले; मेडिकल कॉलेजच्या उभारणीवरुन गिरीश महाजनांचा काँग्रेसला टोला

स्वातंत्र्यानंतर मागील जवळपास 60 वर्षात केवळ 11 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. तर सन 2014 पासून 2023 पर्यंत 09 वर्षात 11 वैद्यकीय महाविद्यालये राज्याच्या सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे दरवर्षी हजारो नवीन डॉक्टर्स निर्माण होवून राज्यभर आरोग्य सेवेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होणार आहे. असा टोला वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य मंत्री गिरीश महाजन यांनी कॉँग्रेसला लगावला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रूग्णालयातील परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील एकूण 5182 पदे भरण्याबाबतची प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सेंट जॉर्जेस रुग्णालय,मुंबई येथे सेंट जॉर्जेस रुग्णालय, ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समुह रुग्णालये, मुंबई संचलित श्रेणीवर्धित शस्त्रक्रियागृहाचे लोकार्पण व रक्त शुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन आणि विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. महाजन बोलत होते. मंत्री गिरीश महाजन म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांमध्ये किडनी फेल्युरचे प्रमाण वाढत आहे आहे. त्याकरीता आवश्यक रक्त शुध्दीकरण केंद्र (मेंन्टेनस हिमोडायलेसिस) शासकीय रुग्णालयामध्ये सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. खाजगी रुग्णालयातील भरमसाठ खर्चामुळे गरीब रुग्णांना हे उपचार परवडणारे नसल्याने ही सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करुन दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

आज मुंबई शहरातील सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये पहिले शासकीय नियमित रक्त शुध्दीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये 12 मशीन असणार आहेत. त्यापैकी 10 मशीन नियमित रक्त शुध्दीकरणाकरिता असणार आहेत. तर 1 मशीन एचआयव्ही व 1 मशीन एचबीएसएजी पॉझीटीव्ह रुग्णाकरिता सुविधा असणार आहे. रक्त शुध्दीकरण केंद्रामधील सुविधा 03 सत्रात चालु राहणार आहे. या केंद्रातून दिवसभरात 30 रुग्णांवर उपचार होणार आहेत.

एका रुग्णाच्या डायलीसीकरीता साधारण 04 तास लागतात त्यामुळे एका सत्रात 10 मशिनच्या माध्यमातून 10 रुग्णांवर डायलीसीस व दिवसात 30 रुग्णांवर डायलीसीस करण्यात येणार आहे. किडनी फेल झालेल्या रुग्णास आठवडयातुन 03 डायलीसीस आवश्यक असल्याने तेच रुग्ण पुन्हा चौथ्या दिवशी डायलिसीस करीता येतील. हिमोडायलीसीस केंद्रामध्ये महात्माफुले योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळणार आहेत. सदर योजनेमध्ये मोडत नसलेल्या रुग्णावर शासकीय दरानुसार रुपये 225 एवढ्या माफक दरात डायलीसीस करण्यात येणार आहे.

मंत्री महाजन म्हणाले, रक्त शुध्दीकरण म्हणजे कायमस्वरूपी ईलाज नसून किडनी प्रत्यारोपन करणे गरजेचे आहे. किडनी प्रत्यारोपन प्रतिक्षायादी मोठी असल्याने अवयव दानाची आवश्यकता आहे, अवयव दानाबद्दल समाजात गैरसमज असल्याने अवयव दानाची चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. 1 ब्रेन डेड रुग्णांपासून 07 (02 किडणी, 01 ह्रदय, 01 लिव्हर, 02 फुफ्फुस, 01 स्वादुपिंड) अवयव प्राप्त होतात. तसेच कार्निया, त्वचा, हाडे यासारख्या उतिंचे देखील दान करण्यात येते.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांचा पुणे पालकमंत्री पदावर दावा; चंद्रकांत पाटील यांचे ‘पालकमंत्रीपद’ धोक्यात!

‘फेसबुक गेम’ चित्रपटातून उलगडणार मर्डर मिस्ट्रीचा थरार

महापालिकांच्या दोन हजार शाळांमध्ये सरकार व्यायामशाळा उभारणार; भाजपची मुंबई पालिकेची जोरदार तयारी

त्यामुळे गरजू रुग्णांना अवयव प्राप्त होवू शकतात. सेंट जॉर्जेस रुग्णालयात वेगवेगळया प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात व रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यामुळे उपलब्ध असलेले शस्त्रक्रिया विभाग कमी पडत होती. तसेच शस्त्रक्रीयाकरीता प्रतिक्षा कालावधी मोठा आहे. याही समस्याचे निवारण करण्यासाठी रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाचे अत्याधुनिकीकरण आवश्यक होते. ओ.टी. कॉम्प्लेक्सचे लोकार्पण करीत आहोत. खाजगी रुग्णालयापेक्षाही सुसज्ज असे शस्त्रक्रियागृह तयार करण्यात आले आहे. यामध्ये 06 ओ.टी. थिएटर असणार आहेत. यामुळे सर्वसामान्य रुग्णांना फायदा होणार असून शस्त्रक्रीया विभागावरचा अतिरीक्त ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

सर्व जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात अद्ययावत आरोग्य सेवा उपलब्ध करणार

राज्यातील नागरिकांना सर्व जिल्ह्यात अद्ययावत आरोग्य सेवा पुरविण्यात येणार असून यामध्ये रक्त शुद्धीकरणाबरोरच मोठ्य शस्त्रक्रिया करण्याची सुविधा सर्व शासकीय रुग्णालयात पुरविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी