27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयअजित पवारच मंत्रिमंडळात पावरफुल; अर्थ खातं राष्ट्रवादीलाच मिळणार

अजित पवारच मंत्रिमंडळात पावरफुल; अर्थ खातं राष्ट्रवादीलाच मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार असेल तरी अजित पवार यांचेच पक्षात जास्त वजन होते, ही बाब वेळोवेळी लपून राहिली नाही. ते आता भाजपाच्या वळचणीला लागलेले असताना तिथेही तेच पावरफुल असल्याची बाब समोर येत आहे. त्यांना अर्थमंत्री करू नये यासाठी शिवसेना शिंदे गटाने जीवाचे रान केल्याने हे प्रकरण थेट अमित शहा यांच्या दरबारात पोहचले. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि अमित शाह यांच्यात काल (बुधवारी) दिल्लीमध्ये बैठक पार पडली. त्यांनी अजित पवार यांची अर्थमंत्रीसह 90 टक्के मागण्यांवर सहमती दर्शवली आहे. शहा या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बोलणार असल्याचे समजते. पावसाळी अधिवेशन झाल्यावर मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे समजते.

खातेवाटपावरुन सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. अशातच आता मात्र खातेवाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले या घटनेला ११ दिवस उलटले. अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला, पण त्यांचे खातेवाटप काही झाले नाही. राष्ट्रवादीतून आलेल्या आणि मंत्री झालेल्यांना चांगली खाते आणि अजित पवार यांना अर्थ खाते देण्यावरून चर्चेचे घोडे अडले होते. शिवसेना एकनाथ शिंदे गटामुळे वाद वाढत गेले. या आमदारांची मनधरणी शिंदे आणि फडणवीस दोघेही करत होते. पण त्याला यश न मिळाल्याने अखेर, अजित पवार , प्रफुल्ल पटेल आणि अमित शाह यांच्यात दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजप हायकमांड मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवार गटाकडून खाते वाटपाबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर जवळपास तिढा सुटला असल्याचं बोललं जात आहे. तसेच, अजित पवारांच्या 90 टक्के मागण्यांवर एकमत झालं असून तिनही पक्षांच्या सहमतीनं अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तिनही पक्षांमध्ये सहमती झाल्यास मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. सत्तेची सगळी समीकरणंच बदलली. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपची कास धरली. अजित पवारांच्या निर्णयानं विरोधकांना पळता भुई थोडी झाली. पण भाजपसोबत आधीपासूनच सत्तेत बसलेल्या शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांची आणि मंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या आमदारांना निद्रानाश जडला. अजित पवारांसोबत 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीला आठवड्याहून अधिक काळ उलटला तरिदेखील अद्याप त्यांचा खातेवाटप झालेला नाही.

हे सुद्धा वाचा:

अब्दुल सत्तार यांची आमदारकी धोक्यात; फौजदारी खटला चालवण्याचे न्यायालयाचे आदेश

60 वर्षात वर्षांचे रेकॉर्ड केवळ नऊ वर्षात मोडले; मेडिकल कॉलेजच्या उभारणीवरुन गिरीश महाजनांचा काँग्रेसला टोला

अजित पवार यांचा पुणे पालकमंत्री पदावर दावा; चंद्रकांत पाटील यांचे ‘पालकमंत्रीपद’ धोक्यात!

शिंदे गटातील मंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या सर्व आमदारांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता थेट दिल्लीतील भाजप हायकंमांडच यामध्ये हस्तक्षेप करणार आहे. आता भाजप हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर तरी खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता पावसाळी अधिवेशनानंतरच होण्याची शक्यता आहे. खातेवाटप लवकरच होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी