27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमुंबईबोरिवली रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडाने विस्कळीत झालेली सेवा सुरळीत

बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडाने विस्कळीत झालेली सेवा सुरळीत

मध्य रेल्वे मार्गावर सिग्नल यंत्रणा, ओवरहेड वायर बिघाड होऊन मार्गावरची सेवावर विस्कळीत होण्याच्या घटना घडत असतात. पश्चिम रेल्वेवर असे प्रकार फारसे घडत नसल्याने या मार्गावरच्या लोकल वेळेवर धावत असतात. असे असताना गुरुवार हा परेच्या प्रवाश्याना त्रासवर ठरला आहे. सकाळपासून उपनगरात पाऊस धारा सुरू आहेत. त्यामुळे कार्यालयात लवकर पोहचण्याच्या उद्देशाने प्रवासी घरातून लवकर बाहेर पडले. मात्र सकाळी ६.५० च्या दरम्यान बोरिवली अप आणि डाऊन मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी वेळेत पोहचणे अवघड झाले. तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली होती . लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत असल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, बोरिवली येथे पॉईंटमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. त्यामुळे ही रेल्वे सेवा सुरळीत होत आहे.

गुरुवारी सकाळपासून उपनगरात पाऊस धारा सुरू आहेत. त्यामुळे कार्यालयात लवकर पोहचण्याच्या उद्देशाने प्रवासी घरातून लवकर बाहेर पडले. मात्र सकाळी ६.५० च्या दरम्यान बोरिवली अप आणि डाऊन मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी वेळेत पोहचणे अवघड झाले होते.

हे सुद्धा वाचा:

अजित पवारच मंत्रिमंडळात पावरफुल; अर्थ खातं राष्ट्रवादीलाच मिळणार

अब्दुल सत्तार यांची आमदारकी धोक्यात; फौजदारी खटला चालवण्याचे न्यायालयाचे आदेश

अजित पवार यांचा पुणे पालकमंत्री पदावर दावा; चंद्रकांत पाटील यांचे ‘पालकमंत्रीपद’ धोक्यात!

 

तसेच लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली. चर्चगेटच्या दिशेला जाणाऱ्या जलद आणि धीम्या दोन्ही मार्गिका विस्कळीत झाल्या होत्या. दरम्यान, बोरिवली येथे पॉईंटमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. त्यामुळे ही रेल्वे सेवा सुरळीत होत आहे. असा दावा पश्चिम रेल्वेने केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी