27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार- आमदार बच्चू कडू

मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार- आमदार बच्चू कडू

रकारच्या खाते वाटपाची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. त्यात अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे गट, भाजपा, अजित पवार गट आणि अपक्ष आमदार यांच्यामध्ये मंत्रीपदासाठी चढाओढ सुरू झाली. यात अपक्ष आमदार बच्चू कडू मंत्रीपदामुळे नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून होत आहे. याविषयावर आज अपक्ष आमदार बच्चू कडू अमरावती येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मंत्री पदाचा दावा सोडण्याचा निर्णय 18 जुलै रोजी जाहीर करणार असल्याचे या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मी मंत्रीपद सोडण्याचा दावा करणार होतो, पण मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की, तू आज निर्णय घेऊ नको मी भेटल्यानंतर याबाबत निर्णय घे. 17 जुलैला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, त्यानंतर 18 जुलैला मी माझ्या निर्णय जाहीर करणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी स्वत: फोन करून पाठिंबा मागितला होता. त्यावेळी आम्ही पाठिंबा दिला. बऱ्याचदा इतर पक्षांकडून आम्हाला आमिष दाखवण्यात आले. पण आम्ही आमच्या पाठींब्यावर ठाम राहिलो. आणि उद्धव ठाकरेही दिलेल्या शब्दावर ठाम राहिले आणि मी राज्यमंत्री झालो, असे बच्चू कडू म्हणाले. आम्ही उद्धव ठाकरेंना दिव्यांग मंत्रालयासाठी भेटत होतो. तेव्हा दिव्यांग मंत्रालय झाले असते तर गुवाहाटीला जायची वेळ आली नसती. एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय तयार केले . त्याबद्दल मी त्यांचा आयुष्यभर आभारी राहीन , असे बच्चू कडू म्हणाले.

हे सुद्धा वाचा:

बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडाने विस्कळीत झालेली सेवा सुरळीत

अजित पवारच मंत्रिमंडळात पावरफुल; अर्थ खातं राष्ट्रवादीलाच मिळणार

अब्दुल सत्तार यांची आमदारकी धोक्यात; फौजदारी खटला चालवण्याचे न्यायालयाचे आदेश

राज्यात सुरू असणाऱ्या सत्ता बदलामुळे राजकारणाचा कंटाळा आला आहे. काही लोक तुम्हाला पद मिळणार नाही असे म्हणतात, सगळे काही पदासाठी नसते आणि मी त्याची पर्वा करत नाही. आमची भूमिका ठाम आहे. इथून पुढे दिव्यांगांसाठी आणि शहीद परिवारांसाठी काम करणार असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी