27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रपावसाळी अधिवेशनासाठी विधिमंडळाची रंगरंगोटीची कामे जोरात

पावसाळी अधिवेशनासाठी विधिमंडळाची रंगरंगोटीची कामे जोरात

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सोमवार( १७ जुलै) पासून हे अधिवेशन सुरू होणार आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै रोजी सुरू होत आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात विविध विभागांचे मागणी प्रस्ताव, कोट्यवधी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मान्य होणार आहे. असे सगळे काही असताना मंत्री, विधानसभा, विधान परिषद अध्यक्ष, सभापती यांच्या दालनासह विधिमंडळातील अनेक विभागांच्या दालनांचे नूतनीकरण, दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जोरात सुरू आहेत.

विधिमंडळात फेरफटका मारल्यावर प्रत्येक विभागातील फर्निचर बाहेर काढून ठेवण्यात आले आहे. सर्वत्र अस्तव्यस्त वस्तू पडल्याचे दिसत आहे. शनिवारपर्यंत ही कामे पूर्ण करायची आहेत. रविवारी चहा पाणीचा कार्यक्रम आहे. त्यापूर्वीच ही कामे दोन सत्रात करण्यात येत आहे.

अजित पवार यांचे बंड आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली पडझड या पार्श्वभूमीवर होणारे हे अधिवेशन यंदा वादळी ठरणार आहे. गेल्या पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेत बंड करून ४० आमदार सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी सुरत, गुवाहाटीवरून गोवा गाठले. नंतर ते विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी विधिमंडळात आले तेव्हापासून गद्दार, पन्नास खोके, एकदम ओके अशा घोषणा या एकनाथ शिंदे गटाच्या आमदाराविरोधात देण्यात आल्या. नंतर पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर, सभागृहात या घोषणा देण्यात आल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गोंधळ, तणाव पहायला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा
उरल्या-सुरल्या शेकापचा बुरूज ढासळू लागला; माजी आमदार विवेक पाटील यांचा राजीनामा

टोमॅटोचे दर पडले तेव्हा केंद्र सरकारने नाफेडतर्फे का खरेदी केली नाही; शेतकरी नेत्यांमध्ये संताप

मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार- आमदार बच्चू कडू

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी