27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयआज चांद्रयान 3 अवकाशात घेणार भरारी, जाणून घ्या प्रक्षेपण कधी आणि कुठे...

आज चांद्रयान 3 अवकाशात घेणार भरारी, जाणून घ्या प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहता येणार?

आज चांद्रयान- 3 चं प्रक्षेपण 14 जुलै रोजी 2:35 वाजता करण्यात येणार आहे. चांद्रयान- 3 च्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती गोळा करण्यासाठी इस्त्रो सज्ज झाले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातुन लाँच व व्हेईकल मार्क-3 LUM-3 रॉकेटद्वारे चांद्रयान- 3 प्रक्षेपित केले जाणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था शाळांनी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली आहे. तसेच तत्पूर्वी मोहिमेच्या यशासाठी इस्त्रोचे शास्त्रज्ञ तिरूपतीच्या व्यंकटचलपती मंदिरात पोहोचले. शास्त्ररांनी पूजेसाठी चांद्रयान- 3 चे लघु मॉडेलही मंदिरात नेले होते.

चांद्रयान- 3 सुमारे 40 ते 45 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान- 3 दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. ही मोहीम यशस्वी झाली तर भारत पृष्ठभागावर अवकाशयान उतरवणारा जगातील चौथा देश बनेल. चांद्रयान- 3 मोहिमेसाठी 615 कोटी रुपये खर्च आला आहे. तर चांद्रयान- 2 चा 960 कोटी रुपये खर्च झाला होता. चंद्रावरील पाणी, खनिजे आणि पृथ्वीची निर्मिती या संशोधनासाठी अनेक विषय घेऊन ही प्रयोगशाळा चंद्राकडे झेपावणार आहे. चांद्रयान- 3 ची लांबी 43.5 मीटर इतकी असून 640 टन वजन इतके आहे.

चांद्रयान- 1
चांद्रयान- 1 हे 22 ऑक्टोबर 2008 रोजी उड्डाण झाले होते. याचा खर्च 386 कोटी रुपये खर्च झाला होता .चांद्रयान-1 ने चंद्रावरील पाण्याच्या शोधामध्ये यश मिळाले.

चांद्रयान- 2
चांद्रयान-2 हे 15 जुलै 2019 ला उड्डाण झाले होते. याचा खर्च 978 कोटी रुपये खर्च झाला होता. चांद्रयान-2 चे क्रॅश लॅडिंग झाले होते.

चांद्रयान- 3
चांद्रयान- 3 हे 14 जुलै म्हणजेच आज दुपारी 2.35 वाजता उड्डाण होणार आहे. तर याचा खर्च 615 कोटी रुपये झाला. चांद्रयान- 3 हे लवकरच यशस्वीरित्या पूर्ण होऊन येईल.

चांद्रयान 3 मोहिमेचा पहिला भाग , 23 ऑगस्टला चंद्राच्या संभाव्य भेटीसह सुमारे 40 दिवसांच्या कालावधीत, इस्रोचे हेवी लिफ्ट LVM3 रॉकेट अंतराळात चांद्रयान 3 अंतराळयानासह अंतराळात प्रक्षेपित करेल. 969.42 सेकंदाच्या (16 मिनिटांपेक्षा जास्त) फ्लाइटमध्ये 179.192 किमी. चांद्रयान 3 मिशनमध्ये चांद्रयान 2 मॉड्यूलसारखे ऑर्बिटर मॉड्यूल नाही आणि लँडरमध्ये फक्त लँडर आणि रोव्हर आहे.

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन उड्डाणानंतर 16 ते 17 मिनिटांत चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचेल. चंद्राच्या पृष्ठभागापासून 179 कि. मी वर असताना लाँच व्हेईकलमधून लँडर वेगळे होणार आहे.

मोहिमेचे तीन मुख्य टप्पे

• यान चंद्राच्या कक्षेत स्थिरावणे

• चांद्रपृष्ठावर अलगद अवतरण (सॉफ्ट लँडिंग)

• ‘लँडर’मधून रोव्हरची चांद्रपृष्ठावर सफर

 

हे सुद्धा वाचा:

कदाचित दहा वर्षानंतरही भावनिक होऊ; राष्ट्रवादीसोबतच्या मैत्रीबाबत फडणवीस बोलले

पावसाळी अधिवेशनासाठी विधिमंडळाची रंगरंगोटीची कामे जोरात

उरल्या-सुरल्या शेकापचा बुरूज ढासळू लागला; माजी आमदार विवेक पाटील यांचा राजीनामा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी