27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयअर्थ खात्याचा कारभार मिळताच अजित पवार लागले कामाला

अर्थ खात्याचा कारभार मिळताच अजित पवार लागले कामाला

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारमध्य उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना देखील मंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती. मात्र गेले १२ दिवस खातेवाटप रखडले होते. मात्र आज मंत्रिमंडळातील या आमदारांचे खातेवाटप झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन खाच्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. खाते मिळताच अजित पवारांनी कामाला सुरवात देखील केली आहे. आज सकाळी त्यांनी अर्थ व नियोजन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सद्यस्थितीची माहिती घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.

महाविकास आघाडी सरकार असताना अर्थमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्या कडे होती. त्यावेळी निधी मिळत नाही हे कारण देऊन शिंदे गटातील आमदार बंड करून सरकारमध्ये सामील झाले पण आत्ता अजित पवार पुन्हा सरकारमध्ये येऊन बसले आणि त्यांच्या हाताला अर्थखाते लागले. आत्ता अर्थखाते मिळणार हे नक्की झाल्यावर त्यांनी वित्त आणि नियोजन विभागाच्याअधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यावेळी उपस्थित होते. अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते अभ्यागत नागरिकांना भेटले.

हे सुद्धा वाचा:

अजित पवार हेच सरकारमध्ये पावरफुल; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे महत्त्वाची खाती

फडणवीस यांनी डाव मांडला, पण हुकुमाचे पत्ते दूर सारले

हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल; चांद्रयान- ३ च्या यशस्वी उड्डानानंतर मोदींच्या शुभेच्छा

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे यांच्याकडे अर्थ व नियोजन विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनातून कामकाजाला सुरुवात केली. अजित पवार यांचे मंत्रालयातील कार्यालय पाचव्या माजल्यावरील 503 क्रमांकाचे असून येथून ते अर्थ व नियोजन विभाग तसेच उपमुख्यमंत्री पदाचे कामकाज पाहणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी