27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमंत्रालयभरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडू यांना मंत्रीपदाची हुलकावणी

भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडू यांना मंत्रीपदाची हुलकावणी

मंत्री पदाचा मोह कोणालाही सुटत नाही. साध्या नगरसेवकाला आमदारकीचे स्वप्न पडतात. तर महाविकास आघाडीत राज्यमंत्री राहिलेल्या बच्चू कडू, दोनदा- तीनदा आमदार असलेले भरत गोगावले, संजय शिरसाट यांनी मंत्री पदाचे स्वप्न पाहणे चुकीचे नाही. राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना खातेवाटप झाल्यावर मंत्री पदाची स्वप्न पाहणारे एकनाथ शिंदे गटाचे त्रिमूर्ती गोगावले, शिरसाट, कडू अद्यापही राज भवनाकडे डोळे लावून बसलेले आहेत. राज भवनाकडून कधी सांगावा येतो असे त्यांना झाले आहे.

अजित पवार यांच्या अर्थ मंत्री पदावरून अडलेले मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर शुक्रवारी झाले. यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला अर्थ, कृषी, सहकार, अन्न व नागरी पुरवठा आणि महिला व बालकल्याण अशी महत्वाची खाती मिळाली. शिवाय शिवसेना आणि भाजपच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आले. पण मंत्रिपदाच्या आशेने बाशिंग बांधलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट, आणि मंत्रिपदाची आशा सोडल्याचे जाहीर करणाऱ्या बच्चू कडू हे मनातल्या मनात हमारा नंबर कब आयेगा म्हणत, मंत्रिपदासाठी पुन्हा राज भवनाकडे डोळे लावून बसलेले आहेत.

पण त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता आहे. ती ते या आमदारांना बोलूनही दाखवत आहेत. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्याने खातेवाटप झाले असले तरी एक वर्षापासून रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिवसेना शिंदे गटाच्या काही आमदारांचे लक्ष लागले आहे. मंत्रिपद मिळावं, यासाठी आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडू यांनी अनेकदा जाहीर इच्छा बोलून दाखवली.

हे सुद्धा वाचा
अजित पवार यांची फाइल दोन चाळणीतून जाणार; निधी वाटपात समानतेसाठी हे नियोजन
अर्थ खात्याचा कारभार मिळताच अजित पवार लागले कामाला
अजित पवार हेच सरकारमध्ये पावरफुल; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे महत्त्वाची खाती  

आमदार भरत गोगावले यांनी आपण 100 टक्के नाही तर 101 टक्का मंत्री होणार आणि रायगडचा पालकमंत्रीही आपणच होणार, असे राणा भीमादेवी थाटात सांगितले आहे. तसेच उद्याच आपण मंत्री होणार, असा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला होता. पण आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त कधी लागणार? आम्हाला काही मिळणार की नाही, अशी कुजबूज शिंदे गटाच्या आमदार मंडळीत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी