27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयडोळे हे जुल्मी गडे.... अजित पवार यांच्या नेत्रपल्लवाने सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली

डोळे हे जुल्मी गडे…. अजित पवार यांच्या नेत्रपल्लवाने सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रांगडे व्यक्तिमत्व आहे. जे काही मनात येईल ते रोखठोक बोलणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे सोलापूरचे धरणात … चे ‘ते’ भाषण वादग्रस्त ठरले होते. असे हे अजित पवार डोळे मारण्यातही तरबेज आहेत. आज नाशिकमधील कार्यक्रमाच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी मारलेला डोळा चर्चेचा विषय झाला आहे. दीड वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेदरम्यान उद्धव ठाकरे बाजूला असताना त्यांनी वाहिन्यांशी बोलण्याआधी असाच डोळा मारल्याची आठवण पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी जागवली.

अजित पवार यांनी 2 जुलै रोजी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये बंड करून आपल्यासह नऊ आमदारांना मंत्री केले. शिवाय त्यांना चांगली खातीही मिळवून दिली. त्यामुळे काही दिवस व्हीलनच्या भूमिकेत वाहिन्यांवर दिसणारे अजित पवार अर्थमंत्री झाल्यावर हिरो झाले. खाते वाटप झाल्यावर त्यांनी आपल्या खात्याच्या अतिरिक्त प्रधान सचिव मंडळींशी चर्चा करून राज्याच्या तिजोरीची माहिती घेतली. या आणि अशा कार्यतत्परतेमुळे त्यांना मानणारा एक चाहता वर्ग हळूहळू राज्यात तयार होत आहे. पण राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्यानंतर टाइम साधणारा नेता म्हणजे अजित पवारच.

हे सुद्धा वाचा

नाशिकच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवते; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

शरद पवारांशी पंगा घेतलेल्या भुजबळ यांना अजित पवार पुरवणार बळ

अजित पवार हे महाविकास आघाडीत होते तेव्हाही त्यांची दादागिरी काही संपली नाही. ते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कधी आडवे गेले नाहीत, किंबहुना अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात खटकेही उडाले नव्हते. असे असताना दीड वर्षापूर्वी एका कार्यक्रमास ते दोघेही उपस्थित होते आणि नंतर वाहिन्यांचे प्रतिनिधी अजित पवार यांची प्रतिक्रिया घेणार तेवढयात उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले आणि त्याक्षणी अजित पवार यांनी डोळा मारला होता. हीच आठवण आज नाशिकचे पत्रकार काढत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी