27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात मुसळधार पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविण्यात आली आहे. या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात 40- 50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या मुंबई केंद्राने सोमवारी शहरासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईतील लोकल ट्रेनची वाहतूक सुरळीत आहे.

आयएमडीने असे म्हटले आहे की, श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून उत्तर केरळ- कर्नाटक- महाराष्ट्र आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. आयएमडीने मच्छीमार समुदायासाठी नोटीस देखील जारी केली आहे आणि त्यांना पुढील पाच दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. किनारपट्टीवर मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला. कमाल आणि किमान तापमान 30 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरात 65.50 मिमी, 19.74 मिमी आणि 23. 56 मिमी पाऊस झाला आहे.

हे सुध्दा वाचा:

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक सरकार विरोधात आक्रमक

मुख्यमंत्री, एक केंद्रीय राज्यमंत्री, एक कॅबिनेट मंत्री; तरीही ठाण्यात वाहतूक कोंडी

डोळे हे जुल्मी गडे…. अजित पवार यांच्या नेत्रपल्लवाने सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली

महाराष्ट्रात काही भागात पाऊस नसल्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. मात्र पावसाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांची चिंता दूर केली आहे. कोकण विभागात सर्व ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पाऊस पडू शकतो. पूर्व आणि पश्चिम विदर्भातही बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली आहे. मुंबईत सतत  मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा 5.2, वैतरणा 3.7, मध्य वैतरणा , भातसा 3.4 , अप्पर वैतरणा 3.2, तुलसी 2.7, विहार 1.5 इतका पाऊस या धरणांमध्ये पडला आहे.

परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, जालना या भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या ठिकाणी वादळी वारे आणि विजेच्या कडकडासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर ओडिशा आणि लगतच्या गंगेच्या पश्चिम बंगाल आणि जम्मूवरील कालचे कमी दाबाचे क्षेत्र कमी चिन्हांकित झाले आहे. तथापि, संबंधित चक्रवाती परिवलन आता दक्षिणेकडे आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात 48 तासांत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी