27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक सरकार विरोधात आक्रमक

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक सरकार विरोधात आक्रमक

 

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये झालेले बंड आणि विविध पार्श्वभुमी ने यंदाचे अधिवेशन गाजणार असल्याची चुणूक सोमवारी सकाळी पहायला मिळाली. विधानसभा सकाळी १० वाजता तर विधान परिषद ११ वाजता सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. खोके सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर एका वर्षात अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडून सत्तेत सामील झाले आणि उपमुख्यमंत्री झाले. काही दिवसांपूर्वीच खातेवाटप झाले आहे यात अजित पवार गटाच्या आमदारांची वर्णी लागली आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कोण वरचढ ठरतय हे पाहायला मिळणार आहे. राज्यात दुष्काळामुळे अडचणीत आलेला शेतकरी आणि महागाई या प्रश्नांवर विरोधक काय भूमिका घेतात ते आज पाहायला मिळणार आहे. आज पासून सुरू होणारे अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. सकाळी 11 वाजता विधानसभा तर दुपारी 12 वाजता विधान परिषद च्या कामाला सुरुवात होत आहे.

काल चहापानच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकत आपली भूमिका स्पष्ट केली होती. तसेच राज्यातील जनतेचे प्रश्न असताना सत्ताधारी फोडा फोडीच्या राजकारणात मग्न आहेत. असा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे. आज अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्याअगोदर कॉँग्रेस आणि ठाकरे गटाने विधानभवन परिसरात आंदोलन केले आहे. यावेळी खोके सरकार हाय हाय अशा घोषणा देत आणि घटनाबाह्य ‘ कलंकीत सरकार चा धिक्कार असो असे बॅनर झळकवत विरोधकांनी सरकारला विरोध दर्शवला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानभवन परिसरात आगमन होताच ’50 खोके एकदम ओके’ आशा घोषणा देण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा:

मुख्यमंत्री, एक केंद्रीय राज्यमंत्री, एक कॅबिनेट मंत्री; तरीही ठाण्यात वाहतूक कोंडी

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पसंती; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सहानुभूती

डोळे हे जुल्मी गडे…. अजित पवार यांच्या नेत्रपल्लवाने सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली

अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते पद गेले असून आज कॉँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे. तसेच राष्ट्रवादीच्या फूटीनंतर अजित पवार गटकडे 40 पेक्षा जास्त आणि शरद पवार गटाकडे 19 आमदार असल्याचा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आला. 9 आमदार वगळता इतर आमदारांनी विरोधी पक्षात बसावे असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोणाकडे कीती आमदार हे आज स्पष्ट होईल.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी