27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीय'धगधगती मशाल' कोणाकडे? उद्धव ठाकरे की समता पार्टी, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

‘धगधगती मशाल’ कोणाकडे? उद्धव ठाकरे की समता पार्टी, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले, त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार हा प्रश्न उभा राहिला. निवडणूक आयोगाने निकाल देत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आणि उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह तात्पुरते वापरण्यास दिले होते. पण या चिन्हावर समता पार्टीने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आत्ता मशाल चिन्ह देखील ठाकरे गटाच्या हातातून जातंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात याचिका दखल केली होती . त्यांच्या या दाव्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

उद्धव ठाकरे यांना ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर समता पार्टीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत, आपल्या पार्टीचे चिन्ह ठाकरे गटाला कसे काय दिले? असा सवाल याचिकेत उपस्थित केला होता. 1996 पासून मशाल हे चिन्ह समता पार्टीकडे आहे. असे सांगत समता पार्टीने निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली होती. यावर उत्तर देत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेले मशाल हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. अंधेरी पोटनिवडणुकीनंतर त्याच्या पुनर्वाटपाबाबत विचार केला जाऊ शकतो. असे म्हटले होते.

हे सुद्धा वाचा:

त्यांची-आमची जुनी ओळख, जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक सरकार विरोधात आक्रमक

निवडणूक आयोगाच्या उत्तरावर समाधान न झाल्यामुळे समता पार्टीने निवडणूक आयोगविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती पण तेथे ही दिलासा मिळाला नसल्यामुळे समता पार्टीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी