27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयरोहित पवार यांच्या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा; ट्विटरवर मानले सर्वांचे आभार

रोहित पवार यांच्या आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा; ट्विटरवर मानले सर्वांचे आभार

अजित पवार यांच्या बंडानंतर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार ही आमदार मंडळी राष्ट्रवादीची खिंड लढवत आहेत. असे असताना शरद पवार यांचा नातू रोहित पवारही अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. याचा प्रत्यय सोमवारच्या पावसाळी अधिवेशनात आला. झाले असे की, कर्जत-जामखेडवर होणारा अन्याय थांबून ‘एमआयडीसी’ला मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. यासंदर्भात सकाळपासून पवारांनी विधानभवन परिसरात, भर पावसात आंदोलन केले. रोहित पवारांची भूमिका समजून घेत सर्वपक्षीय आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी त्यांची भेट घेत या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळेच की काय रोहित पवार यांनी ट्विटरवर या सगळ्या आमदारांचे आभार मानले आहे.

रोहित पवारांनी सकाळपासूनच विधानभवन आवारात ठिय्या मांडला. भर पावसात, हातात फलक घेत आंदोलन करणाऱ्या रोहित पवारांची चर्चा सर्वत्र सुरु झाली. त्यानंतर नेत्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तर काही आमदारांनी रोहित पवारांच्या सुरातसुर मिसळत त्यांना पाठिंबा दिला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संजय बनसोडे, शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, काँग्रेसचे नेते सुनील केदार, कुणाल पाटील, भाई जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अजय चौधरी, सचिन अहिर, उदयसिंह राजपूत, आमशा पाडवी, धीरज देशमुख, दिलीप बनकर आदी नेत्यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. अशी माहिती ट्विट करत रोहित पवारांनी दिली आहे.

एमआयडीसी’च्या मंजुरीसाठी रोहित पवारांचा सरकारकडे बरेच दिवसांपासून पाठपुरावा सुरु आहे. याबाबत उद्योगमंत्री, मुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना निवेदन दिले होते. सरकारने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर मंजुरी न मिळाल्यास आंदोलन करू, असा इशारा सरकारला रोहित पवार यांनी दिला होता. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पावसाळी अधिवेशनात ‘एमआयडीसी’ मुद्दा मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे रोहित पवार यांनी आपले उपोषण स्थगित केले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी