30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयचार वर्षे शरद पवारांच्या नेतृत्त्वात काम केले, गटबाजीला कंटाळून पक्षाला रामराम; अनिल...

चार वर्षे शरद पवारांच्या नेतृत्त्वात काम केले, गटबाजीला कंटाळून पक्षाला रामराम; अनिल गोटे यांनी पत्रात सगळंच सांगून टाकले

अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फुट पडली आहे. अनेक आमदार संभ्रमात असले तरी पक्षातील गटबाजीमुळे आता पदाधिकारी, नेत्यांनी पक्षाला रामराम करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तसेच धुळे, नंदुरबार प्रभारी माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षाला रामराम केला आहे. अनिल गोटे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र पाठविले आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आपण जबाबदारीतून मुक्त होत असल्याचे गोटे यांनी म्हटले आहे.

अनिल गोटे यांनी पक्षाचे पद आणि सदस्यत्त्व सोडत असताना एक सविस्तर पत्र लिहीले असून ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना देखील पाठविले आहे. त्या पत्रामध्ये अनिल गोटे यांनी म्हटले आहे की, भाजपा मधील गटबाजी, गुंडाना खुलेआम समर्थन व संरक्षण तसेच प्रोत्साहन देण्याच्या मनोवृत्तीस कंटाळून आपण मुदतपूर्व विधानसभा सदस्यत्वाचा व पक्षाचा राजीनामा देवून बाहेर पडलो. राष्ट्रवादी स्वच्छेने प्रवेश घेतला. सलग चार वर्षे माननीय शरद पवारांचे नेतृत्व स्विकारुन माझ्यासह लोकसंग्राम मधील अनेक लहान मोठे कार्यकर्ते राष्ट्रवादीत सहभागी झाले.

अनिल गोटे यांनी पत्रात म्हटले आहे की, अर्थात लोकसंग्रामच्या सर्वच कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काम करण्याचा माझा निर्णय मान्य होता असे नाही. पण केवळ माझ्या प्रेमापोटी सर्वच कार्यकर्त्यांनी आपली नाराजी माझे जवळ स्पष्ट शब्दात बोलून दाखविली. त्याच बरोबर तुम्ही जेथे आम्ही तेथे अशी भूमिका स्विकारुन माझ्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात कार्यरत झाले, धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षास पुनश्च चांगले दिवस यावेत शेतक- यांचे कष्टक-यांचे प्रश्न मार्गी लागावेत. लोकशाहीची पुर्नस्थापना व्हावी. यासाठी धुळे, शिंदखेडा, साकी तालुक्यात १०८ ठिकाणी ‘शिवार बैठका घेवून श्रीमंताचे लाड करण्या ऐवजी गरीब कष्टक-याला न्याय मिळावा. पक्षाच्या नवीन शाखांची निर्मिती तसेच पक्षाच्या फलक अनावरनाचे कार्यक्रम आयोजित केले.

ग्रामिण भागात तथा स्थानिक पातळीवर पक्षाचे तरुण पण नवीन नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. कोव्हीडच्या प्रारंभीच्या काळात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एक दिवस फोन आला. “कोव्हीडच्या संकटाची आपणास कल्पना नाही. हा आजार फार गंभीर आजार आहे. ताबडतोब शिवार बैठका थांबवा.” असे आदेश मा. पवार साहेबांनीच दिले. त्यामुळे नव्या दमाने सुरु केलेल्या पक्षाच्या उभारणीच्या कार्यक्रमास खीळ बसली. ती कायमचीच !, असे देखील अनिल गोटे यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

दरम्यान शिंदखेड्याचे आमदार माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या आवास्तव प्रशासकीय हस्तक्षेपाने दोंडाईचा, शिंदखेडा मतदार संघातील जनता त्रस्त झाली होती. रावल पिडीत अनेक लोक मला येवून सातत्याने भेटत होते. ‘तुम्हीच काही करा’ असे पदोपदीने सांगत होते. याची पुर्ण कल्पना वरिष्ठ नेतृत्वास दिली. ‘दहशतवाद मुक्त शिंदखेडा मतदार संघ’ ही भुमिका घेवून आम्ही सर्व कार्यकर्ते मतदार संघातील गावन-गाव पिंजून काढले. दिनांक १७ फेब्रुवारी रोजी दोंडाईचा येथे समारोप व मा. शरद पवारांच्या विशाल मेळाव्याचे नियोजन डॉ. हेमंत देशमुखांचे बंधू व जावई प्रतिक पाटील, गिरीधारीलाल रामरख्या ललीत वारुळे इत्यादींच्या सहकार्याने आयोजीत केले. पण समारोपाच्या मेळाव्याच्या एक दिवस आधी पवार साहेबांचा कार्यक्रम रद्द झाल्याचा निरोप आला. महाराष्ट्रात कोव्हीड साठीची बंधने पुनश्च लागू करण्याचा शासन निर्णय झाल्याने पवार साहेब येवू शकत नाहीत. असे कारण सांगण्यात आले. असे अनिल गोटे यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा 

संभाजीनगरात काळया धंद्यांना सोन्याचे दिवस; अवैध धंद्यांशी संबंधितांवर गृहमंत्री फडणवीस कारवाई कधी करणार ? जनतेचा थेट सवाल

मंत्री मंगल प्रभात लोढांचे डोके ठिकाणावर आहे का ?

नेमाडेंच्या वक्तव्याने समाजाचा आरसा स्पष्ट दिसला…

गटबाजी कायमसाठी थांबवून पक्ष एक संघ ठेवण्याच्या प्रयत्नास यश न आल्याने तसेच पक्षातून आपण बाहेर पडलो तर पक्ष नेतृत्व गटा-तटाचे राजकारण संपुष्टात आणू शकेल. या विचारातून मी स्वतः व माझ्या सहका-यांनी राष्ट्रवादीत राहून आपसांतील वादावादीत वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा आपण आपल्या वेळेचा सदुपयोग धुळेकर जनतेच्या रस्ता, पाणी, सार्वजनिक स्वच्छता या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी करु, असा निर्णय घेतला आहे. यासाठी मी व माझ्या सहका-यांनी राष्ट्रवादीच्या सेवेतून मुक्तता घेत असल्याचे पक्षाच्या वरीष्ठ नेतृत्वास कळविले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात वरिष्ठांचे माझ्या वाट्याला आलेले प्रेम व जीवघेण्या आजारातून सुखरुप बाहेर पडल्यानंतर मला केलेल्या मदती बद्दल आजन्म ऋणी आहे. माझ्या मनात कोणा बद्दलही कटुतानाही. नाराजी नाही. पक्षाला चांगले व वैभवाचे दिवस प्राप्त व्हावेत. या सदिच्छांसह जय लोकसंग्राम !! पुनश्च हरी ओम ! असे अनिल गोटे यांनी पत्रात म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी