29 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeटॉप न्यूजpandharpur vitthal rakhumai : पंढरपुरात 8 वर्षानंतर विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला वज्रलेप

pandharpur vitthal rakhumai : पंढरपुरात 8 वर्षानंतर विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला वज्रलेप

टीम लय भारी

पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणा-या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या (Pandharpur Vitthal Rakhumai Vajaralepa) मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी मूर्तीला वज्रलेप करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विधी व न्याय विभागाने वज्रलेप करण्यास मान्यता दिली आहे. तब्बल 8 वर्षांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीवर लेपन प्रक्रिया होणार आहे. यापूर्वी 2005 आणि 2012 साली श्रीविठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप प्रक्रिया पार पडली आहे. यामुळे मूर्तीचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे

पंढरपूर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. असलेल्या विठूरायाचं पदस्पर्श दर्शन घेता येतं. पदस्पर्श, मंदिरातील वातावरण आणि मूर्तीवर होणारे राजोपचार यामुळे मूर्तीची झीज होत आहे. याबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मूर्तीला वज्रलेप करण्यास परवानगी द्यावी, असा ठराव महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवला होता. या ठरावाला आता मान्यता मिळालेली आहे. पुरातत्व विभागाच्या तज्ञांशी चर्चा करुन आषाढी एकादशीच्या पूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप होऊ शकतो, अशी माहिती विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी माध्यमांना दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी