26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeटॉप न्यूजमनसेने 48 तासांत माफी मागावी, अन्यथा... : युवा सेनेकडून ‘कायदेशीर’ इशारा

मनसेने 48 तासांत माफी मागावी, अन्यथा… : युवा सेनेकडून ‘कायदेशीर’ इशारा

टीम लय भारी

मुंबई :  मुंबई महापालिकेमार्फत ‘कोरोना’साठी खरेदी केलेल्या साहित्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला होता. त्यावर आता ‘युवा सेने’चे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी देशपांडे यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे ( Varun Sardesai has sent legal notice to Sandip Deshpande ).

Mahavikas Aghadi

‘देशपांडे यांनी ४८ तासांच्या आत माफी मागावी. भ्रष्टाचाराच्या आरोपाचे व्हिडीओ सोशल मीडियातून वगळावे अन्यथा कायदेशीर कार्यवाही केली जाईल’ असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. सरदेसाई यांनी आपल्या वकिलांकरवी देशपांडे यांना ही नोटीस पाठविली आहे.

हे सुद्धा वाचा

गांधी, नेहरू, आंबेडकर विचारधारेच्या संपादकांवर ‘महाविकास आघाडी’ सरकारकडून गुन्हा दाखल

गोपीनाथ मुंडे यांचे दोन विश्वासू ‘महाविकास आघाडी’ सरकारमध्ये सर्वोच्च पदावर

आदित्य ठाकरे जे बोलले, ते त्यांनी करून दाखवले

Coronaeffect : रुग्णालयातील भयावह परिस्थिती पाहून मनसे नेता रडला!

‘अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. जिथे भ्रष्टाचार दिसेल तिथे लाथ मारणारच’ अशा शब्दांत देशपांडे यांनी सरदेसाईंना प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत देशपांडे यांनी एक ट्विट केले आहे ( Sandip Deshpande replied to Varun Sardesai ). मनसे व युवा सेनेमधील या आरोप प्रत्यारोपांमुळे दोन्ही संघटनांमध्ये चांगलीच जुंपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

MoneySpring

‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी वापरण्यात आलेल्या शवपिशव्यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. निविदा न काढताच ही खरेदी करण्यात आली आहे. या खरेदी प्रक्रियेत वरूण सरदेसाई यांचा हात असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

देशपांडे यांनी केलेला हा आरोप खोटारडा आहे. त्यात काहीही तथ्य नाही. केवळ माझी प्रतिमा मलीन करणे, करिअरला नुकसान पोहचविण्याच्या अनुषंगाने हा आरोप केल्याचे सरदेसाई यांनी पाठविलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये म्हटले आहे.

मनसेने 48 तासांत माफी मागावी, अन्यथा... : युवा सेनेकडून ‘कायदेशीर’ इशारा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी