29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeराजकीयछगन भुजबळ यांची उमेदवारी गुलदस्त्यात

छगन भुजबळ यांची उमेदवारी गुलदस्त्यात

नाशिक लोकसभेच्या जागेवरून शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्षामध्ये रस्सीखेच सुरू आहे. यात आता भर पडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) उडी घेतली आहे. नाशिकच्या जागेवर आमचा हक्क असल्याचं छगन भुजबळ < Chhagan Bhujbal > यांनी म्हटलं आहे. लोकसभेची आचारसंहिता शनिवारी लागू झाली आहे. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक मधून हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. यावर बिजेपीची नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे.(Chhagan Bhujbal’s candidature)

भुजबळांनी केला हा दावा
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रा तील 20 जागांची पहिली यादी जाहीर केली. यात उत्तर महाराष्ट्रा तील सहा जागा आहेत. तर उर्वरित 2 जागा शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला कडे आहेत. यात शिर्डीची जागा शिवसेनेकडे असल्याने नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी पक्षाने दावा केला आहे. रविवारी नाशिक शहरात पार पडलेल्या एका कार्यक्रमात भुजबळ यांनी याची माहिती दिली आहे. उत्तर महाराष्ट्रा त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक तरी जागा असावी यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. श्रीकांत शिंदे बाबत नाराजी श्रीकांत शिंदे यांनी नाशिक शहरात कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचे आहे. यासाठी सर्वांनी कामाला लागा असे आवाहन कार्यकर्त्याना करण्यात आले. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी युतीची शिस्त पळली नसल्याचा आरोप करण्यात आला. या सोबत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त करत श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल उपस्थित केला होता. हे उमेदवार इच्छुक नाशिक शहरातून महायुतीकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. यात शिवसेनेकडून (शिंदे गट) हेमंत गोडसे, भारतीय जनता पक्षाकडून अनिल जाधव नितीन ठाकरे बापू साहेब पिंगळे आणि दिनकर पाटील तर अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज निडवणूक लढणार असल्याचं म्हटलं जातं आहे. महायुतीच्या या रस्सीखेच मध्ये जागा कोणाला मिळते आणि उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. महायुतीच्या या रस्सीखेच मध्ये जागा कोणाला मिळते आणि उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी