27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeआरोग्यगुढी पाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खाल्ला जातो? जाणून घ्या

गुढी पाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खाल्ला जातो? जाणून घ्या

गुढी पाडव्याला (Gudi Padwa) कडू लिंबाचा पाला आणि गुळ खाण्याची प्रथा आहे. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी महाराष्ट्रात गुढीपाडवा (Gudi Padwa) साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. गुढीपाडव्याला गुढी उभारण्याची प्रथा आहे. या दिवशी महाराष्ट्रातील लोक आपल्या घराबाहेर गुढी उभारतात. एका लांब बांबूच्या टोकाला नवं वस्त्र, साखरमाळ, फुलांची माळ तसेच त्यावर तांब्याचा कलश लावला जातो. गुढीला कडू लिंबाची पानेही लावण्याची प्रथा आहे तसेच खाल्लीही जातात. तसेच या लिंबासोबत गुळही दिला जातो. तर यामागचे नेमकं कारण काय ते जाणून घेऊयात.(gudi padwa why neem leaves and jaggery eaten )

  • गुढीपाडव्यादिवशी कडू लिंबाची कोवळी पाणे खाण्याला काही शास्त्रीय महत्त्व आहे. कडू लिंब आणि गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत जे आरोग्य आणि सौंदर्य या दोन्ही बाबतीत शरीराला खूप फायदे देतात.
  • उन्हाळा जसजसा जवळ येतो तसतसे त्वचेशी संबंधित विविध आजार होण्याची शक्यता वाढते या आजारांवर कडू लिंब फार महत्त्वाचा ठरतो. कडुलिंबाची पाने औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात.

वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला नेमकं काय खावं?

  • गुळासोबत कडुलिंबाचा पाला चावल्याने शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडतात.
  • तुम्ही एका दिवसात 6 ते 8 कडुलिंबाची पाने खाऊ शकता. कडुलिंबाची पाने नियमित चघळल्याने साखरेची पातळी कमी होते.
  • कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
  • पाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकली जाते. ही पाने रक्तशुद्धीकरणासाठी मदत करते. त्यामुळे वर्षभर निरोगी राहण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला कडुलिंबाची पाने आणि गुळाचे सेवन करण्याची परंपरा आपल्याकडे रुढ झालीय.

लवकर जाग येत नाही, तर ‘या’ टिप्स करा फॉलो

  • उष्णतेमुळे पोटाशी संबंधित अनेक आजारांचा प्रादुर्भाव वाढतो, कडुलिंब या आजाराला आपल्या शरीरापासून दूर ठेवण्यास खूप मदत करतो. कडुलिंब पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात जास्त मदत करते.
  • कोंडा, केस गळणे, खाज सुटणे, पुरळ येणे इत्यादीपासून आराम मिळवून देण्यासाठी कडुलिंब एक उत्तम आणि गुणकारी पर्याय आहे.
  • गोड पदार्थामध्ये गूळ हा सर्वात आरोग्यदायी पर्याय म्हणून मानला जातो.

उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला होणार ‘हे’ फायदे, जाणून घ्या

  • गुळामुळे पचनक्रिया सुधारते. गुळ खाल्ल्यानंतर आम्लपित्त होण्याची शक्यता कमी असते. गुळामध्ये खनिजे, कार्बोहायड्रेट्स आणि इतर अनेक पौष्टिक घटक असतात.
  • हवामानातील बदलामुळे श्वसनाचे अनेक प्रकारचे आजार उद्भवतात, त्यांच्याशी लढण्यासाठी गुळ आणि कडुनिंब उपयुक्त आणि प्रभावी ठरतात.
  • गुळामध्ये असलेले फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा चमकते. म्हणूनच कडुलिंब आणि गूळ गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर खाल्ला जातो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी