30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांच्या दिल्ली वारीनंतर आता माढ्यासाठी नव्या नावाची चर्चा

शरद पवारांच्या दिल्ली वारीनंतर आता माढ्यासाठी नव्या नावाची चर्चा

दिल्लीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी बड्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर माढ्यासाठी नव्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. एकिकडे माढा लोकसभेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच पवारांची दिल्लीवारी पाहता माढ्यातील राजकारणाला नवं वळण लागलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेले विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच आता दुसरीकडं माढ्यासाठी नव्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दिल्लीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी बड्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर माढ्यासाठी नव्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. एकिकडे माढा लोकसभेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच पवारांची दिल्लीवारी पाहता माढ्यातील राजकारणाला नवं वळण लागलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेले विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच आता दुसरीकडं माढ्यासाठी नव्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Sharad pawar meets big leader delhi new twist on madha candidacy)

माढ्याच्या उमेदवारीबाबत शरद पवार व प्रवीण गायकवाड यांची रविवारी दिल्लीत बैठक होऊन सविस्तर चर्चाही झाली आहे. या बैठकीबाबत प्रवीण गायकवाड म्हणाले की, माढा मतदारसंघात मोहिते पाटील निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यांनी तुतारीच्या चिन्हावर लढावे, ते निश्चितपणे निवडून येतील.

शरद पवारांच्या मनातला डाव उलटला मग आता माढ्यात कुणाला संधी?

परंतु त्यांनी तुतारी हाती न घेतल्यास स्वतः माढ्यातून लढण्यास तयार असल्याचे पवारांना मी सांगितले आहे. मोहिते पाटलांनी लवकर निर्णय न घेतल्यास मी जोमाने ‘तुतारी’ हाती घेऊन माढा निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळं माढा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी CBIला दिला मोलाचा सल्ला

माढा मतदारसंघातूनही ‘तुतारी’ चिन्हावर लढावे, यासाठी मोहिते पाटलांवर दबाव वाढत असल्याचे चित्र आहे. याबाबत मोहिते पाटील कोणताच निर्णय घेत नसल्यामुळे माढ्याबाबत शरद पवार गटाकडून नवी खेळी खेळली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

छगन भुजबळ यांची उमेदवारी गुलदस्त्यात

माढा मतदारसंघातून सुरवातीला शरदचंद्र पवार गटाने रासपचे महादेव जानकरांना उमेदवारी देण्याचे वक्तव्य स्वतः शरद पवार यांनी केले होतं. परंतु ऐनवेळी महादेव जानकर महायुतीबरोबर गेल्याने मतदारसंघात धनगर समाजाचा उमेदवार म्हणून शेकापचे  अनिकेत देशमुख मतदारसंघात फिरू लागले आहेत. परंतु संभाजी ब्रिगेडमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेले व समाजाचा चेहरा म्हणून आपला वेगळा ठसा उमटवलेले प्रवीण गायकवाड यांना शरद पवार यांनी माढा लढण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिल्याने नवखा उमेदवार माढ्याला महाविकास आघाडीकडून मिळणार का? याबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी