29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रयंदा नाशिकच्या रिंगणात तब्बल बारा पक्ष अन् दहा अपक्ष

यंदा नाशिकच्या रिंगणात तब्बल बारा पक्ष अन् दहा अपक्ष

नाशिकसह दिंडोरीत २० मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी अनेक उमेदवार रिंगणात उतरल्याने ही लढत बहुरंगी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नाशिकमध्ये गोडसे, वाजे, शांतिगिरी महाराज आणि करण गायकर यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. तर, दिंडोरीमध्ये मात्र भारती पवार आणि भास्कर भगरे यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे.यंदा नाशिकच्या रिंगणात तब्बल बारा पक्ष अन् दहा अपक्ष. या बहुरंगी लढतीत छोटे पक्ष आणि अपक्ष किती मतदान घेतात यावर उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून असेल. नाशिकमध्ये अशी परिस्थिती असताना दिंडोरीतही वेगळी स्थिती नाही.

नाशिकसह दिंडोरीत २० मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी अनेक उमेदवार रिंगणात उतरल्याने ही लढत बहुरंगी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नाशिकमध्ये गोडसे, वाजे, शांतिगिरी महाराज आणि करण गायकर यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. तर, दिंडोरीमध्ये मात्र भारती पवार आणि भास्कर भगरे यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे. यंदा नाशिकच्या रिंगणात तब्बल बारा पक्ष अन् दहा अपक्ष(12 parties and 10 independents).या बहुरंगी लढतीत छोटे पक्ष आणि अपक्ष किती मतदान घेतात यावर उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून असेल. नाशिकमध्ये अशी परिस्थिती असताना दिंडोरीतही वेगळी स्थिती नाही.(As many as 12 parties and 10 independents are in the fray for Nashik this time.)

देशभरात मान्यता असलेल्या पक्षांची संख्या ३०० च्या आसपास असली तरी त्यातील बहुतांश पक्ष केवळ नोंदणीकृत आहेत. त्यांना राष्ट्रीय मान्यता नसल्याने त्यांनाही अपक्षांप्रमाणेच चिन्हाचे वाटप केले गेले. त्यामुळे पक्ष मान्यताकृत असले तरी त्यांची चिन्हे मात्र दोन्ही मतदारसंघात वेगवेगळी असू शकतील.

२०२४
दिंडोरी :

माकप, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, आंबेडकर राइट पार्टी ऑफ इंडिया, बहुजन वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी, भारत आदिवासी पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बळीराजा पार्टी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल, एमआयएम यांसह सुमारे ६ अपक्ष रिंगणात आहेत.

नाशिक :

शिंदे सेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी, धर्मराज्य पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, भारतीय अस्मिता पार्टी, इंडियन पीपल्स अधिकार पार्टी, भारतीय लोकशक्ती पक्ष यांसह २२ अपक्ष.

२०१९
नाशिक :

शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, भारतीय ट्रायबल पार्टी, बहुजन समाजवादी पक्ष, १० अपक्ष (तीन महिला)

दिंडोरी :

भाजप, राष्ट्रवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय शोषित पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, १ अपक्ष

२०१४
नाशिक :

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बहुजन समाज पार्टी, मार्क्सवादी समाज पार्टी, आम आदी पार्टी, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, बहुजन मुक्ती पार्टी, इंडियन युनियन मुस्लीम लीग यांसह ६ अपक्ष

दिंडोरी :
भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी, भारिप-बहुजन महासंघ, आम आदमी पार्टी, तीन अपक्ष

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी