29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्र९०० मीटर उंचीपर्यंत कमी दाबाचा पट्टा : मतदानाच्या दिवशी अवकाळीचे ढग दाटून...

९०० मीटर उंचीपर्यंत कमी दाबाचा पट्टा : मतदानाच्या दिवशी अवकाळीचे ढग दाटून येण्याचा अंदाज

राज्याच्या हवामानात अचानकपणे बदल होऊ लागला आहे. येत्या १८मेपर्यंत संपूर्ण मराठवाडा, विदर्भासह उत्तर, मध्य महाराष्ट्रात गडगडाटी वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. यामुळे सोमवारी (दि. २०) मतदानाच्या दिवशीसुद्धा अवकाळीचे ढग दाटून येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शहरात शुक्रवारपासून हवामानात बदल झाला आहे. शुक्रवारी वादळी पाऊस झाला. तसेच शनिवारीही रात्री नऊ वाजेपासून शहर व उपनगरांमध्ये वादळी गडगडाटी पावसाने जोरदार हजेरी लावली.

राज्याच्या हवामानात ( weather) अचानकपणे बदल होऊ लागला आहे. येत्या १८मेपर्यंत संपूर्ण मराठवाडा, विदर्भासह उत्तर, मध्य महाराष्ट्रात  गडगडाटी वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. यामुळे सोमवारी (दि. २०) मतदानाच्या दिवशीसुद्धा अवकाळीचे ढग (Clouds ) दाटून येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शहरात शुक्रवारपासून हवामानात बदल झाला आहे. शुक्रवारी वादळी पाऊस झाला. तसेच शनिवारीही रात्री नऊ वाजेपासून शहर व उपनगरांमध्ये वादळी गडगडाटी पावसाने जोरदार हजेरी लावली.(Low pressure area up to 900 m altitude: Unseasonal clouds expected on polling day )

येत्या १८ मेपर्यंत नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह २९ जिल्ह्यांमद्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी मध्यम तर काही जिल्ह्यांत गडगडाटी विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावू शकतो, असा अंदाज सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ  माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशातील मध्य भागातील क्षेत्रात समुद्रसपाटीपासून दीड किमी इतक्या उंचीपर्यंत चक्रीय वाऱ्याची निर्माण झालेली स्थिती व या चक्रीय वाऱ्याच्या क्षेत्रापासून दक्षिण आसाममधील हाफलाँग व सिल्व्हरपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत पातळीत पूर्व-पश्चिम पसरलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्टा व त्यामुळे दोन्ही समुद्रांत बाष्पपुरवठ्यामुळे मराठवाडा ते कन्याकुमारीपर्यंत वारा खंडितता प्रणाली तयार झाली आहे. त्यामधून ९०० मीटर उंचीपर्यंतचा हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीची स्थिती तयार झाली आहे, असे खुळे यांनी त्यांच्या हवामानाच्या अंदाजात म्हटले आहे. ही परिस्थिती बदलल्यास अवकाळीचे ढग दूर होऊ शकतात.

इन्फो

आजही गडगडाटी पावसाचा इशारा
मुंबईच्या कुलाबा वेधशाळेकडून जाहीर करण्यात आलेल्या पावसाच्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यासाठी रविवारपर्यंत (दि. १२) विजांच्या कडकडाटासह गडगडाटी पावसाचा इशारा वर्तविण्यात आला आहे. यावेळी सोसाट्याचा वारा ताशी ४० ते ५० किमी इतक्या वेगाने वाहू शकतो, असेही वेधशाळेने म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी