25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeक्राईमपुण्यातील कार अपघातप्रकरणी आजोबालाही अटक, ड्रायव्हरला डांबल्याचा आरोप

पुण्यातील कार अपघातप्रकरणी आजोबालाही अटक, ड्रायव्हरला डांबल्याचा आरोप

पुण्यातील कल्याणीनगरमधील कार अपघातप्रकरणी बिल्डर विशाल अग्रवाल याचा मुलगा आरोपी वेदांत अग्रवाल याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. बिल्डर विशाल अग्रवाल यालाही अटक झाली आहे. आता पोलिसांनी कारवाई करत आरोपी वेंदात अग्रवाल याचे आजोबा सुरेंद्र कुमार यालाही अटक केली आहे. त्यामुळे अग्रवाल कुटुंबाच्या तीन पिढ्या सध्या पोलिसांच्या कचाट्यात सापडल्या आहेत.

पुण्यातील कल्याणीनगरमधील कार अपघातप्रकरणी (Pune car accident) बिल्डर विशाल अग्रवाल याचा मुलगा आरोपी वेदांत अग्रवाल याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. बिल्डर विशाल अग्रवाल यालाही अटक झाली आहे. आता पोलिसांनी कारवाई करत आरोपी वेंदात अग्रवाल याचे आजोबा सुरेंद्र कुमार यालाही अटक (Grandfather arrested) केली आहे. त्यामुळे अग्रवाल कुटुंबाच्या तीन पिढ्या सध्या पोलिसांच्या कचाट्यात सापडल्या आहेत.(Grandfather arrested in Pune car accident case, driver accused of being detained)

आरोपीचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा तुरुंगात करण्यात आली आहे. नातवाच्या कारनाम्यानंतर आता आजोबा कारनामा समोर आला आहे. बिल्डर मुलगा विशाल अग्रवाल याला पळून जाण्यात मदत केल्याचा आणि नातवाने केलेल्या अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी ड्रायव्हरवर दबाव आणल्याचा आरोप आता आजोबा सुरेंद्र अग्रवाल याच्यावर करण्यात आला आहे. नातवाला बाजूला करून ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला गुन्ह्याची जबाबदारी घेण्यासाठी सुरेंद्र अग्रवाल याने दोन दिवस डांबल्याचा आरोप आहे. नातू अडचणीत येऊ नये यासाठी अपघातानंतर लगेचच ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न केला गेला, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

आपण कार चालवत असल्याचं ड्रायव्हरने सुरुवातीला सांगितलं, हे खरं आहे. पण ड्रायव्हरने कोणाच्या दबावाखाली हे वक्तव्य केलं? याचाही आम्ही तपास करत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले होते. यानंतर आता पोलिसांनी कारवाई करत सुरेंद्र अग्रवाल याला अटक (Grandfather arrested) केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी