30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeराजकीयनेहरू-आंबेडकरांचे संबंध परस्पर आदराचे अन् तणावाचे

नेहरू-आंबेडकरांचे संबंध परस्पर आदराचे अन् तणावाचे

एकीकडे महात्मागांधी आणि काँग्रेसच्या विरोधात राजकीय लढाई लढतअसतानाच बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे प्रमुख होतात आणि त्याचवेळी पंडितजवाहरलाल नेहरूयांच्या मंत्रिमंडळातही सहभागी होतात, हा विरोधाभास त्या काळात आणि आजवर चर्चेचाविषय आहे. त्याचे ऐतिहासिक संदर्भ शोधतानाच पंडित जवाहरलाल नेहरूआणि बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय संबंध कसे होते हाही एक  अभ्यासाचा विषय आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्यात दोन पातळ्यांवर लढा देत होते(The Nehru-Ambedkar relationship was one of mutual respect and tension). एकीकडे अस्पृश्यसमाजासाठी राजकीय हक्कांची लढाई  आणि सांस्कृतिक पातळीवर त्यांचा  हिंदुत्वाच्याविरोधात संघर्ष सुरूहोता.एकीकडे महात्मागांधी आणि काँग्रेसच्या विरोधात राजकीय लढाई लढतअसतानाच बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे प्रमुख होतात आणि त्याचवेळी पंडित जवाहरलाल नेहरूयांच्या मंत्रिमंडळातही सहभागी होतात, हा विरोधाभास त्या काळात आणि आजवर चर्चेचाविषय आहे. त्याचे ऐतिहासिक संदर्भ शोधतानाच पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेबआंबेडकर यांचे राजकीय संबंध कसे होते हाही एक  अभ्यासाचा विषय आहे.महात्मा गांधींचेप्रखर विरोधक असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी महात्मा गांधींचे अनुयायीआणि सहकाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आदर, जिव्हाळावाटणं याची अपेक्षा कोणी करणार नाही. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांची तशी खास मैत्री नसली तरी या दोन नेत्यांमध्ये कमालीचे सामंजस्य होते. एकमेकांविषयी प्रचंड आदर होता.  दोन प्रमुख नेत्यांनी आपल्या आयुष्यात कधीहीआणि चुकूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्यता दिली नाही. संघाच्या कोणत्याही कार्यक्रमाला किंवा शाखेला या दोन नेत्यांनी कधीही भेट दिली नाही. उलट संघफॅसिस्ट विचाराचाआहे याविषयी या दोन नेत्यांमध्ये एकमत होतं. संघाचा देशाला आणि लोकशाही विचारप्रणालीला धोका आहे याची जाणीव या नेहरू व आंबेडकरांना होती. हे दोन्ही नेते लोकशाहीवादी आणि विज्ञानवादी विचाराचे होते.स्वातंत्र्यानंतरचा भारत कसा असावा हा या दोघांच्याही चिंतनाचा विषय होता. विशेष म्हणजे मंत्रिमंडळातअसतानाही बाबासाहेब आंबेडकर काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणांवर टीका टिप्पणीकरत असत .शेड्युलकास्ट फेडरेशनच्या लखनऊ येथील सभेत बाबासाहेब आंबेडकर यांनीकाँग्रेस पक्षावरजोरदार टीका केली होती. याप्रकरणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नेहरूंकडे बाबासाहेबांची तक्रार केली.  त्यांच्यातक्रारीनंतर पंडित नेहरू यांनी बाबासाहेबांकडे आपण काही संकेतपाळावेत, मंत्रिमंडळातत असताना आमच्या पक्षावर टिका करु नका, अशी अपेक्षा व्यक्तकेली.काश्मीर प्रश्नावरही बाबासाहेबांचे नेहरूंसोबत  मतभेद होते.नेहरूआपल्याला महत्त्वाच्या संसदीय समित्यावर काम करण्याची संधी देत नाहीत अशी बाबासाहेबांचीतक्रार होती. कायदेमंत्रीशिवाय एखादे इतर खाते आपल्याला मिळावं अशी बाबासाहेबांनी नेहरूंकडे मागणी केली होती. नियोजन खाते निर्माण करून ते आपल्याकडे देण्यात येईल असे नेहरूंनी दिलेलं आश्वासन पाळले नाही. तसेच मागासवर्गाला आणि दलितांना सरकारकडून मिळणारी वागणूक अस्वस्थ करणारी आहे असे बाबासाहेबांचे म्हणणेहोते. अशा अनेकबाबतीत नेहरू आणि बाबासाहेबांमध्ये मतभेद होते.  नेहरूंच्या परराष्ट्रधोरणात भोंगळपणाआहे, अव्यवहार्य व स्वप्नाळू तत्त्वनिष्ठता आहे अशी टीकाबाबासाहेबांनीकेली. तरीही बाबासाहेबांसोबत झालेला पत्रव्यवहार नेहरूंनी लोकसभेत वाचून दाखवला. नशीबआणि लोकसभेचेनियम आपल्या विरोधात गेले. त्यामुळे हिंदू कोड बिलासाठी आता आपणकाही करू शकतनाही. पण प्रगतीसाठी हिंदू कोड बिल पास झाले पाहिजे याबाबत माझीखात्री आहे.त्यामुळे हिंदू कोड बिलाचा लढा मी चालूच ठेवीन असा निर्धार नेहरूंनी व्यक्तकेला होता.सरकारमध्ये राहूनअनेक विषयावर नेहरूंसोबत बाबासाहेबांचे मतभेद झाले. तरीही नेहरूंनी राष्ट्रहिताच्याआणि प्रगतीच्या निर्णयाबाबत नेहमीच बाबासाहेबांना पाठिंबा दिला. देशातील सिंचनाचा प्रश्न,विजेचा प्रश्न, कोळश्याचा प्रश्न याबाबतीत बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेलं धोरण आणि केलेल्या कामाची नेहरूंनी नेहमीच पाठराखण केलेली आहे. मंत्री म्हणून सर्वसामान्यांच्याहिताच्या निर्णयासाठी नेहरूंनी नेहमीच बाबासाहेबांना पाठिंबा दिलेला आहे.स्वतंत्रभारताच्या पहिल्या सरकारमध्ये पंतप्रधान म्हणून नेहरूंनी अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा केला. एक प्रकारे हा बाबासाहेब आंबेडकरांचा हानेहरूंनी केलेला गौरव समजला पाहिजे. समकालीन नेत्यांसोबत बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक बाबतीत मतभेद होते. मात्र बाबासाहेब आंबेडकरांएवढी वैचारिक उंची इतर कोणत्याही नेत्याची नाही यावर नेहरूंचा विश्वासहोता.लय भारीच्या ‘’गांधी-नेहरूयांनी देशाचं खरचं नूकसान केलं का .’’या विशेषांकांत देशातील ४५ पेक्षा जास्त मान्यवरांचे लेख आहेत.यात शरद पवार, राजदीप सरदेसाई ,श्रीराम पवार, राजेंद्र साठे, अतुल भातखळकर आदींचा समावेश आहे..हा विशेषांक खरेदी करण्यासाठी आपण ९८२१२८८६२२या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी